बुधवारी (दि. 19 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील 26वा सामना राजस्थान रॉयल्स वि. लखनऊ सुपर जायंट्स संघात जयपूर येथे पार पडला. राजस्थानचा बालेकिल्ला असलेल्या सवाई मानसिंग स्टेडिअमवरील सामन्यात लखनऊने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात लखनऊकडून राजस्थानला 10 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर कर्णधार संजू सॅमसन याने मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, त्याच्या संघाची फलंदाजी पाहता, हे आव्हान त्यांनी पार करायला पाहिजे होते.
काय म्हणाला संजू सॅमसन?
सामन्यानंतर संजू सॅमसन (Sanju Samson) म्हणाला की, “नक्कीच चांगले वाटत नाहीये, पण आम्हाला धडा घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. आमच्याकडे जो फलंदाजी क्रम आहे, ते पाहता हे आव्हान गाठायला हवे होते. त्यांनी चांगली गोलंदाजी केली. परिस्थितीचा चांगला वापर केला, पण मला अजूनही असे वाटते की, हे आव्हान आम्ही पार करायला हवे होते.”
सामन्यात अवघ्या 2 धावांवर धावबाद होऊन तंबूत परतणारा सॅमसन खेळपट्टीबाबत बोलताना म्हणाला की, “मी अशाप्रकारच्या कमी उसळी असणाऱ्या खेळपट्टीची आशा करत होतो आणि मला वाटते की, आम्हाला असेच काहीसे मिळाले. आम्ही समंजस्यपणे क्रिकेट खेळण्याची गरज आहे. आम्ही जवळपास 9 ते 10 षटकांपर्यंत चांगल्या स्थितीत होतो. आम्हाला मधल्या षटकात एक मोठ्या धावसंख्येचे षटक होते. त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्ही जास्त प्रयत्न केला, तर विकेट्स गमावल्या.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 154 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जयसवाल (35 चेंडूत 44 धावा, 4 चौकार आणि 2 षटकार) आणि जोस बटलर (41 चेंडूत 40 धावा, 4 चौकार, 1 षटकार) यांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी दिली. तरीही राजस्थान संघाला 20 षटकात 6 विकेट्स गमावत 144 धावाच करता आल्या. त्यामुळे लखनऊने राजस्थानचा 10 धावांनी पराभव केला.
Marcus Stoinis is adjudged Player of the Match for his all-round performance here in Jaipur as @LucknowIPL win by 10 runs.
Scorecard – https://t.co/gyzqiryPIq #TATAIPL #RRvLSG #IPL2023 pic.twitter.com/UxB8QJ9Bz0
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2023
लखनऊकडून गोलंदाजी करताना आवेश खान याने 25 धावा खर्च 3, तर मार्कस स्टॉयनिस याने 28 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. तसेच, नवीन उल हक यानेही फायदेशीर गोलंदाजी करत 4 षटकात 19 धावा खर्च केल्या. मात्र, त्याला एकही विकेट मिळाली नाही.
लखनऊच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर प्रथम फलंदाजी करताना त्यांनी काईल मेयर्स (51) याच्या अर्धशतकाच्या जोरावर 154 धावा केल्या. मेयर्सने केएल राहुल (KL Rahul) (39) याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी रचली. निकोलस पूरन (29) आणि स्टॉयनिस (21) यांनी पाचव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचत धावसंख्या 150पर्यंत नेली.
राजस्थानकडून गोलंदाजी करताना फिरकीपटू आर अश्विन याने 4 षटकात 23 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, ट्रेंट बोल्ट यानेही 4 षटकात 16 धावा खर्च करत 1 विकेट घेत फायदेशीर गोलंदाजी केली. या पराभवानंतरही राजस्थान गुणतालिकेत 8 गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे, तर लखनऊ संघ 8 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. (we have loved to win the first game at jaipur says rr skipper sanju samson)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुड न्यूज! ‘हा’ महान फलंदाज 47व्या वर्षी दुसऱ्यांदा बनला बापमाणूस, पत्नीच्या पोटी राजकुमारीचा जन्म
धसमुसळ्या फलंदाजीने राजस्थानचा पराभव! लखनऊचा 155 धावांचा बचाव करत 10 धावांनी विजय