भारतीय क्रिकेटपटू कृणाल पंड्या आणि हार्दिक पंड्या यांनी मंगळवारी (16 जानेवारी) रोजी त्यांच्या वडिलांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी एक भावनिक संदेश लिहिला आणि काही फोटोही शेअर केले आहेत.
क्रुणाल पंड्या आणि हार्दिक पंड्या ( Krunal Pandya And Hardik Pandya) यांचे वडील हिमांशू पंड्या यांचे 16 जानेवारी 2021 रोजी निधन झाले. क्रुणाल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामना खेळत असताना त्यांचा मृत्यू झाला होटा. कृणालने नंतर खुलासा केला की, त्याने श्रद्धांजली म्हणून त्याच्या वडिलांचे सामान कसे ड्रेसिंग रूममध्ये नेले होते. (we miss you everyday krunal hardik pandya pens down heartfelt note on fathers death anniversary)
पंड्या बंधूंना त्यांचे वडील गमावून तीन वर्षे झाली आहेत. कृणाल आणि हार्दिक दोघांनीही वेगवेगळ्या प्रसंगी त्यांच्या वडिलांबद्दल बोलले आहे. त्यांच्या वडिलांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त, क्रुणालने त्यांना आणखी एक मनःपूर्वक श्रद्धांजली वाहण्यासाठी इंन्स्टावर लिहीले की, “बाबा, आम्हाला रोज तुमची आठवण येते. आज तूम्हाला आम्हाला सोडून तीन वर्षे झाली. तुमची शारीरिक अनुपस्थिती असूनही, तुमचे गुण आणि तुम्ही आम्हाला शिकवलेले अमूल्य धडे आमच्या हृदयात आहेत. नैतिकता, कठोर परिश्रम, स्वप्नांचा पाठलाग करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक चांगला माणूस बनणे ही तुमची शिकवण आम्हाला तुमची आठवन करून देते. मला आशा आहे की, तूम्ही कोण होतास आणि किती अद्भुत व्यक्ती होतास कथांद्वारे आम्ही तुमचे ज्ञान आमच्या मुलांना देऊ आणि तुम्ही नेहमी आमच्या आठवणीत राहाल. पुन्हा धन्यवाद बाबा.”
View this post on Instagram
क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, 32 वर्षीय क्रुणाल शेवटचा विजय हजारे ट्रॉफी 2023 मध्ये खेळताना दिसला होता. त्याच वेळी, त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै 2021 मध्ये खेळला, तेव्हापासून तो संघात परतला नाही. डावखुरा अष्टपैलू खेळाडू आता आयपीएल 2024 दरम्यान पुन्हा एकदा मैदानात परतणार आहे. (We miss you every day Hardik-Krunal emotional shared special post on father’s death anniversary)
हेही वाचा
‘असा गुण जो विराट, सचिन आणि धोनीमध्येही नाही?’ दादाने दिले एका शब्दात जबरदस्त उत्तर
Gujarat Titans । संघाला फरक पडत नाही! हार्दिक पंड्याबाबत मोहम्मद शमीचे मोठे विधान