Loading...

त्या सर्वात मोठ्या निर्णयासाठी डेव्हिड वॉर्नर करणार पत्नीशी चर्चा

मंगळवारी(14 जानेवारी) ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध मुंबईत पार पडलेल्या पहिल्या वनडेत 10 विकेट्सने विजय मिळवला. या विजयात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार ऍरॉन फिंच यांनी 258 धावांची सलामी भागीदारी रचत महत्त्वाचा वाटा उचलला. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेसाठी डेव्हिड वॉर्नर उपस्थित होता.

Loading...

यावेळी त्याला विचारण्यात आले की तो भारतात होणाऱ्या 2023 चा विश्वचषकात ऍरॉन फिंच बरोबर सलामीला फलंदाजी करण्याच्या विचार करतो का? यावर वॉर्नरने मजेशीर उत्तर देताना म्हटले आहे की ‘याबद्दल पत्नीला विचारावे लागेल.’

वॉर्नर म्हणाला, मला वाटते आम्ही(वॉर्नर आणि फिंच) याबद्दल आमच्या पत्नीशी बोलू. त्या विश्वचषकापर्यंत आमचे वय 36 ते 37 वर्षे असेल. मला तीन मुली आहेत. मला वाटते ते शेवटचे असेल.’

‘या तीन वर्षात काहीही होऊ शकते. तूमच्याकडे लय असेल, पत्नी आहे, कुटुंब आहे. एकावेळी एकच पाउल उचलायचे आहे. सध्या आमचे लक्ष राजकोटवर होणाऱ्या दुसऱ्या वनडेवर आहे.’

Loading...

‘मला वाटते आत्ता आमच्याकडे चांगले खेळाडू आहेत. संभाव्यत: आमच्या वरिष्ठ खेळाडूंसह आम्ही तो विश्वचषक खेळू शकतो.’

तसेच तो पुढे म्हणाला, ‘पुढचा विचार करता मला विश्वचषकात खेळायला आवडेल. पण अजून हा लांबचा रस्ता आहे. पण जर मी तो विश्वचषक खेळलो. तर मी खूप नशीबवान असेल की मला एक चांगली पत्नी मिळाली.’

वॉर्नरच्या या उत्तरामुळे तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच हसू आवरता आले नाही.

Loading...
Loading...

वॉर्नरने मुंबईत झालेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत 112 चेंडूत नाबाद 128 धावा केल्या होत्या. तसेच फिंचने नाबाद 110 धावा केल्या होत्या.

पुढचा वनडे सामना राजकोटला शुक्रवारी (17 जानेवारी) होणार आहे.

You might also like
Loading...