भारत- इंग्लंड यांच्यात 1 ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे.
या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ जोरदार तयारीला लागले आहेत. भारतीय संघाने या इंग्लंड दौऱ्यात टी-20 मालिका 2-1 ने जिंकली होती, तर एकदिवसीय मालिकेत इंग्लंडने भारतावर 2-1 ने विजय मिळवला होता.
सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअस्ट्रोने, या कसोटी मालिकेत इंग्लंड भारताचा सहज पराभव करेल असे वक्तव्य केले आहे.
“इंग्लंडच्या कसोटी आणि एकदिवसीय संघातील खेळाडू जवळपास तेच आहेत. तसेच एकदिवसीय मालिकेच्या विजयाने मानसिकदृष्ट्या आम्हीच वरचढ आहोत. एकदिवसीय मालिकेतील विजयाची लय कायम ठेवत, कसोटी मालिकेतही आम्ही भारताला पराभूत करु. ” असे जॉनी बेअस्ट्रो म्हणाला.
भारताची इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये कायमच निराशाजनक कामगिरी झाली आहे. त्यामुळे भारतीय संघावर या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्याचा दबाव असेल.
आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाचा, इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत कस लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, स्टार गोलंदाजावर दोन वर्षाची बंदी
-म्हणून सचिन तेंडुलकरने इंग्लंडमध्ये सुरु केली क्रिकेट अकादमी