इंग्लंड आणि न्यूझीलंड या देन संघात सध्या ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडला १३२ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी १४१ धावांवर संपला. पहिल्या डावात जोरावर इंग्लंडला ९ धावांची आघाडी मिळाली आहे. इंग्लंडकडून या सामन्यांत दोन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. एक मॅथ्यू पॉट्स आणि दुसरा मॅट पार्किन्सन. पॉट्सला मालिका सुरू होण्याआधीच संघात घेण्यात आले होते. मात्र, पार्किसनच्या पदार्पणाची गोष्ट निराळी आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या इंग्लंड संघात पार्किन्सनचा समावेश नव्हता. मात्र, लॉर्ड्स कसोटीच्या सुरुवातीच्या तासात इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लीचला क्षेत्ररक्षण करताना डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे लीचला चक्कर येणे यासारखी लक्षणे दिसू लागली. याच कारणामुळे लीच लॉर्ड्स कसोटीतून बाहेर गेला. या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात एकही फिरकी गोलंदाज नव्हता. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने लंडनपासून ३२० किमी अंतरावर असलेल्या मँचेस्टरमध्ये बसलेल्या मॅट पार्किन्सनला घाईघाईने बोलावणे धाडले. पार्किन्सनलाही पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतरच संघात सामील होता आले आणि याच कारणामुळे त्याने लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कसोटी पदार्पण केले.
Congratulations to @mattyparky96 on receiving his maiden England Test cap 🧢#ENGvNZ | #WTC23 pic.twitter.com/02mYjWERCd
— ICC (@ICC) June 3, 2022
आयसीसीच्या नियमानुसार, दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा संघात समावेश केला जाऊ शकतो. पण संघात येणारा खेळाडू हा जखमी खेळाडूसारखा असावा. म्हणजेच जर फलंदाज दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला, तर त्याच्या जागी फक्त फलंदाज येईल आणि फिरकी गोलंदाज फिरकी गोलंदाजाची जागा घेईल. याच कारणामुळे लीच सामन्यातून बाहेर पडताच पार्किन्सनला संघात घेण्यात आले आणि बर्याच दिवसांपासून कसोटी पदार्पणाची वाट पाहणाऱ्या पार्किन्सनला इंग्लंडकडून कसोटी खेळण्याची संधी मिळाली.
दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पार्किन्सनला त्याची कसोटी कॅप मिळाली. त्याला दुसऱ्या दिवशीच मैदानात उतरण्याची संधीही मिळाली. इंग्लंडने दुसऱ्या दिवशी १३० धावांत ९ विकेट गमावल्या, तेव्हा इंग्लंड न्यूझीलंडपेक्षा २ धावांनी पिछाडीवर होता. पार्किन्सनने येताच जोरदार फटकेबाजी करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. मात्र, न्यूझीलंजच्या गोलंदाजांसमोर पार्किन्सन जास्त वेळ टिकू शकला नाही. त्याने ८ चेंडूत ८ धावा केल्या. पण, या छोट्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडवर ९ धावांची आघाडी घेतली.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रोहितच्या बालपणीच्या प्रशिक्षकांचा विराटला पाठिंबा; म्हणाले, ‘गावसकर अन् रिचर्ड्सप्रमाणे कोहलीही…’
बाबो! IPLच्या एका सामन्याची किंमत होणार १०० कोटी? बनू शकते जगातील दुसरी महागडी स्पोर्ट्स प्रॉपर्टी
‘तुमच्या प्रामाणिकपणावरच प्रश्न उपस्थित केल्यावर दु:ख होते’, संघाची साथ सोडल्यानंतर हळहळला साहा