---Advertisement---

बहुप्रतिक्षित भारत-विंडीज चौथ्या टी२० सामन्यात पाऊस मोडता घालणार? वाचा संपूर्ण रिपोर्ट

On: शनिवार, ऑगस्ट 6, 2022 12:57 PM
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी-२० सामना (IND vs WI) फ्लोरिडा येथील लॉडरहिल स्टेडियमवर खेळवला जाईल. सध्या टीम इंडिया ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पुढे आहे, तर पाचवा टी-२० सामनाही याच स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र, २०१९मध्ये या स्टेडियमवर दोन्ही संघांची शेवटची गाठ पडली होती. इथली खेळपट्टी टीम इंडियासाठी अनोळखी नाही, शिवाय या खेळपट्टीवर टीम इंडियाचा रेकॉर्ड सुद्धा चांगला आहे.

फ्लोरिडाच्या या खेळपट्टीवर टीम इंडियाने जवळपास ११ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारत आणि वेस्ट इंडिजच्या ४ सामन्यांचाही समावेश आहे. २०१६मध्ये भारताला वेस्ट इंडिजकडून पराभव स्वीकारावा लागला होता, तर दुसरा सामना रद्द झाला होता. त्याच वेळी, भारत आणि विंडीज संघ पुन्हा एकदा २०१९मध्ये आमनेसामने आले, जिथे टीम इंडियाने दोन्ही प्रसंगी विजय मिळवला. यासह, शेवटच्या वेळी यूएसए आणि आयर्लंड यांच्यात टी-२० सामना खेळला गेला होता ज्यामध्ये यजमान यूएसएने आयर्लंडचा पराभव केला होता.

खेळपट्टीचा अहवाल
लॉडरहिल, फ्लोरिडा येथे ११ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले गेले ज्यात १५५.४ च्या सरासरीने धावा झाल्या आहेत. दुसरीकडे, देशांतर्गत सामन्यांमध्ये २४ सामन्यांमध्ये १५७च्या सरासरीने धावा केल्या आहेत. येथील खेळपट्टी सहसा संथ असते ज्यामध्ये फिरकीपटूंना खूप फायदा होतो त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होतो. कारण या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ११ पैकी ९ सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यात नाणेफेक अत्यंत महत्त्वाची मानली जाऊ शकते.

हवामानाचा अहवाल
शनिवार, ६ ऑगस्ट रोजी फ्लोरिडातील हवामान सुमारे २३ अंश राहण्याची शक्यता आहे आणि ८९ टक्के आर्द्रतेसह ५० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, रविवारी, ७ ऑगस्ट रोजी पुन्हा तापमान २३ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असली तरी पावसाची शक्यता ७० टक्के आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

CWG2022: एका घटनेने ‘सोनेरी स्वप्ना’चा चुराडा, भारतीय महिला हॉकी संघाने गमावली सेमीफायनल

काय आहे ‘कुलचा’ जोडी फुटण्याचे कारण? माजी दिग्गजाने सांगितली निवडकर्त्यांची अडचण

विराट, रोहितसोबत जे घडतंय, तेच सचिन आणि गांगुलीसोबतही घडून गेलंय; बीसीसीआय अधिकाऱ्याचे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---