भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान आजपासून (२३ मार्च) तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. हे तिन्ही सामने विनाप्रेक्षक पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर खेळविले जातील. आजच्या या सामन्यासाठी वातावरण व खेळपट्टी कशी असेल? याबाबत माहिती समोर आली आहे.
असे असेल वातावरण
आज दुपारी १.३० वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात दिवस गरम स्वरूपाचा राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. २५ टक्के आद्रतेसह तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके राहील. पाऊस पडण्याची शक्यता नाही. मात्र, सायंकाळच्या वेळी ढग दाटून येऊ शकतात.
अशी असेल खेळपट्टी
पहिल्या सामन्यासाठी वापरण्यात येणारी एमसीए स्टेडियमवरील खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना अनुकूल असेल. मात्र, सामना पुढे सरकल्यानंतर ती फिरकी गोलंदाजांना मदत करेल. तरीही सामन्यात फलंदाजांचा दबदबा राहील. या मैदानावर ५० टक्के सामने हे धावांचा पाठलाग करताना जिंकले गेले आहेत. त्यामुळे नाणेफेकीचा तितकासा प्रभाव पडणार नाही. तरीही, धावांचा पाठलाग करणे काहीसे सोपे जाईल.
या सामन्यात भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाजांचा उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इंग्लंड संघाला मालिकेपूर्वी धक्का बसला असून, अनुभवी फलंदाज जो रूट व टी२० मालिका गाजवणारा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मायदेशी परतले आहेत.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, कुलदीप यादव व युजवेंद्र चहल.
वनडे मालिकेसाठी इंग्लंडचा संघ-
ओएन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (उपकर्णधार व यष्टीरक्षक), जेसन रॉय, लियाम लिव्हींगस्टोन, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स, सॅम करन, टॉम करन, मोईन अली, मार्क वूड, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद व रिसे टोप्ले.
महत्त्वाच्या बातम्या-
चौथ्या क्रमांकावर कोणत्या मुंबईकरांची लागणार वर्णी? प्रश्न अजूनही अनुत्तरित
वनडे मालिकेत रोहितसह ‘हा’ फलंदाज येणार सलामीला, कोहलीनेच केला खुलासा
धक्कादायक! पंचांनी ठोठावलेल्या निर्णयाने खेळाडूंमध्ये मारामारी; ठोसा लागून जमिनीवर पडला गोलंदाज