भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेला (27 जुलै) पासून सुरुवात होणार आहे. भारताचा हा श्रीलंका दौरा आहे. टी20 मालिकेसाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. तत्पूर्वी भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी20 सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. 3 टी20 सामने पल्लेकेले या मैदानावर खेळले जाणार आहेत.
भारत आणि श्रीलंका (27 आणि 28 जुलैला) लागोपाठ पहिले दोन सामने खेळणार आहेत. त्याचबरोबर या टी20 मालिकेतील शेवटचा सामना (30 जुलै) रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता पल्लेकेले या मैदानावर होणार आहेत. पहिल्या टी20 सामन्याबद्दल बोलायचं तर (27 जुलै) रोजी पल्लेकेलेमध्ये काळे ढग असणार आहेत. तसंच एक्यूवेदरच्या अहवालानुसार तिथं 3 तास जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर, टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघ 29 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये भारताचं वर्चस्व राहिलं आहे. भारतानं 19 सामने जिंकले आहेत. तर केवळ 9 सामने गमावले आहेत. श्रीलंका संघ फक्त 9 सामने जिंकला आहे. 19 सामन्यांमध्ये त्यांना भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे.
टी20 मालिकेसाठी दोन्ही संघ
भारत- शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, अक्षर पटेल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद
श्रीलंका- चारिथ असलंका (कर्णधार) पाथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, महेश तीक्ष्णा, चामिंडू विक्रमासिंघे, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो
महत्त्वाच्या बातम्या-
Women’s Asia Cup: (26 जुलै) रंगणार सेमीफायनलचा थरार…! भारतासमोर बांगलादेशचं मोठं आव्हान
‘या’ दोघांपैकी एकच फलंदाज इलेव्हनमध्ये खेळू शकेल, कारण पंतची जागा निश्चित आहे; माजी फील्डिंग कोचचे मत
एसएनबीपी स्कूलचे हॉकी स्पर्धेत पूर्णपणे वर्चस्व, सर्वच्या सर्व जेतेपदांवर मोहोर