दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (centurion) मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ११३ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या (Johannesburg) मैदानावर पार पडला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. यासह ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे.
मालिकेतील तिसरा कसोटी सामना केपटाऊनच्या (Capetown) मैदानावर पार पडणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ इतिहास रचण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तत्पूर्वी जाणून घेऊया कसे असेल या सामन्यातील वातावरण?
व्हिडिओ पाहा-
हवामानाची माहिती देणाऱ्या एका सांकेतिक स्थळाने दिलेल्या माहितीनुसार, केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी (११ जानेवारी) ढगाळ वातावरण असेल. तसेच पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे की, पहिल्या दिवसातील लंचपूर्वीचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात येऊ शकतो. परंतु त्यानंतर कुठलाही अडथळा येणार नाही.( Weather report of 3rd test between South Africa vs India)
सामन्याच्या पाचव्या दिवशी कसे असेल सामन्याचे वातावरण?
केपटाऊनमध्ये पहिल्या दिवशी (११ जानेवारी) पाऊस येण्याची शक्यता ६४ टक्के आहे. तर दुसऱ्या (१२ जानेवारी) आणि तिसऱ्या (१३ जानेवारी) दिवशी पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे. तर अंतिम दिवशी (१५ जानेवारी) पाऊस पडण्याची शक्यता १९ टक्के आहे. ज्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, सामन्यातील पहिला दिवस सोडला तर इतर ४ दिवशी पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे.
हेही वाचा- Virat Kohli PC Live : ‘देशासाठी खेळणे नेहमीच अभिमानास्पद’ – विराट कोहली, पाहा संपूर्ण पत्रकार परिषद
तसेच भारतीय संघाची केपटाऊनच्या मैदानावरील कामगिरी पाहिली तर, भारतीय संघाने १९९३ पासून ५ कसोटी सामने खेळले आहेत. या ५ सामन्यांपैकी ३ कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर २ सामने अनिर्णीत राहिले आहेत.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद रश्मी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव किंवा इशांत शर्मा.
महत्वाच्या बातम्या :
स्टोकने थेट लपवलं तोंड अन् धरून बसला डोकं, सिडनी कसोटीतील शेवटच्या षटकात असं काय घडलं?
पहिल्या कसोटीचा हिरो दुसऱ्या कसोटीत ठरला झिरो! लाजिरवाण्या विक्रमाच्या यादीतही अव्वल स्थानी
हे नक्की पाहा :