भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्सच्या हेडिंग्ले येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघ पूर्ण तयारीसह या मैदानावर उतरतील. परंतु आपल्या सर्वांना माहित आहे की, इंग्लंडमध्ये दोन संघांव्यतिरिक्त, हवामानदेखील आपला खेळ खेळत असतो. अशातच 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्याआधी लीड्सच्या हवामानाबद्दल जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जाईल. सध्या जर आपण लीड्सच्या हवामानाबद्दल बोललो तर सामान्यतः सामन्यादरम्यान हवामान मोकळे असेल. थोडेफार ढग आकाशात राहतील. परंतु चांगली गोष्ट म्हणजे संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाची शक्यता खूप कमी आहे.
मात्र इंग्लंडच्या वातावरणावर कधीही पूर्ण विश्वास ठेवता येत नाही. कारण तेथील हवामान कधीही बदलू शकते आणि तेथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कधीही पडू शकतो. सामन्यादरम्यान हवामान कसे असेल? ते पाहूया…
पहिला दिवस- तापमान 23-13 डिग्री, आद्रता 93-85% , हवेचा वेग 10-15 किलोमीटर प्रति तास
दुसरा दिवस – तापमान 18-11 डिग्री, आद्रता 72-82 %, हवेचा वेग 15-25 किलोमीटर प्रति तास
तिसरा दिवस- तापमान 18-11 डिग्री, आद्रता 74-86% , हवेचा वेग 10-15 किलोमीटर प्रति तास
चौथा दिवस- तापमान 20-11 डिग्री, आद्रता 74-86 %, हवेचा वेग 10-15 किलोमीटर प्रति तास
पाचवा दिवस – तापमान 20-11 डिग्री, आद्रता 74-86% , हवेचा वेग 10-15 किलोमीटर प्रति तास
भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले गेले आहेत. पहिला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. पण लॉर्ड्स कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय नोंदवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
लॉर्ड्स कसोटीत झालेल्या अपमानास्पद पराभवामुळे तिसऱ्या कसोटीत जिंकायचेच हा विचार यजमान इंग्लंड संघ करत असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिकेत 2-0 ने आघाडी घेण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. भारतीय संघासाठी इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची ही एक उत्तम संधी आहे आणि भारतीय संघ यावेळी हा चमत्कार करण्यात नक्कीच यशस्वी होईल अशी सर्वांना आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चौदा वर्षापूर्वी सचिन झाला होता नर्वस नाईंटीजचा शिकार, भोवलेला पंचांचा चुकीचा निर्णय
हार्दिकचा रुबाबच न्यारा! महागडे घड्याळ घालून केली अबु-धाबीची सैर, किंमत ऐकून फिरतील डोळे
विंडीजच्या एकाहून एक सरस गोलंदाजांना पाकिस्तानच्या यष्टीरक्षकाने दिल्या टिप्स, खेळाडूंना फुटलं हसू