---Advertisement---

वेल डन डॅडी..! डी कॉकच्या ढांसू शतकीय खेळीला १७ दिवसांच्या लेकीने असे केले चीयर, फोटो व्हायरल

Quinton-De-Kock-And-Daughter
---Advertisement---

रविवारी (२३ जानेवारी) केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यासह त्यांनी वनडे मालिकाही ३-० ने खिशात घातली. दक्षिण आफ्रिकेला शेवटचा सामना जिंकून देण्यात यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने या सामन्यात खणखणीत शतक (Quinton De Kock Century) झळकावले. त्याच्या या शतकी खेळीला त्याची पत्नी साशा डी कॉक (Sasha De Kock) हिने विशेष पद्धतीने चीयर केले, ज्याची माहिती तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे दिली आहे.

सलामीला फलंदाजीला येत डी कॉकने शानदार प्रदर्शन केले. त्याने रासी वॅन डर ड्यूसेनसोबत मिळून शतकी भागिदारी तर केलीच. सोबतच कारकिर्दीतील १७ वे वनडे शतकही झळकावले. पुढे ३६ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने शिखर धवनच्या हातून त्याला झेलबाद केले. अशाप्रकारे १३० चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने १२४ धावा करून त्याच्या मॅरेथॉन खेळीवर पूर्णविराम लागला.

व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener

त्याच्या या प्रशंसनीय खेळीला त्याची पत्नी साशा घरून टीव्हीवर पाहात होती. आपल्या पतीने शतक केल्याच्या कौतुकाने तिने आपल्या १७ दिवसांच्या मुलगी कियारा (Kiara De Kock) ला टिव्हीपुढे आणून तिचा फोटो काढला. हा फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. यावर कॅप्शन देत तिने लिहिले होते की, ‘वेल डन डॅडी (खूप छान खेळतात पप्पा).’ डी कॉक फॅमिलीच्या या क्यूट क्षणाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. 

https://twitter.com/man4_cricket/status/1485219630906245126?s=20

दरम्यान या शतकासह डी कॉकने विक्रमांचे रतीब घातले आहे. त्याने या सामन्यात केलेले विक्रम खालीलप्रमाणे-

भारताविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके करणारे फलंदाज.
१. सनथ जयसूर्या (८५ डाव) – ७ शतके
२. क्विंटन डी कॉक (१६ डाव) – ६ शतके*
३. एबी डिविलियर्स (३२ डाव) – ६ शतके
४. रिकी पॉंटिंग (५९ डाव) – ६ शतके
५. कुमार संगकारा (७१ डाव) – ६ शतके

एका संघाविरुद्ध सर्वात कमी डावांमध्ये ६ शतक करणारे फलंदाज
१. क्विंटन डी कॉक – दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत (१६ डाव)*
२. विरेंद्र सेहवाग – भारत विरुद्ध न्यूझीलंड (२३ डाव)
३. एरॉन फिंच – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (२३ डाव)
४. सईद अन्वर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (२६ डाव)

एका संघाविरुद्ध सर्वात कमी डावांमध्ये १००० एकदिवसीय धावा करणारे फलंदाज
१. हाशिम आमला – दक्षिण अफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज (१४ डाव)
२. व्हिव्ह रिचर्ड्स – वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड (१५ डाव)
३. स्टीव स्मिथ – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (१६ डाव)
४. क्विंटन डी कॉक – दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत (१६ डाव)*

महत्त्वाच्या बातम्या-

आख्खी टीम राष्ट्रगीतात मग्न असताना विराटचं सुरू होतं भलतंच काही, पाहून प्रचंड संतापले चाहते

भारतीयांची मनचं लई मोठी! शतकवीर डी कॉकची बुमराहने थोपटली पाठ, कर्णधार राहुलकडूनही कौतुक

ऋतुराजवर अन्याय झालाय?, जबर फॉर्ममध्ये असूनही खेळण्याची संधी न दिल्याने भडकले भारतीय चाहते

हेही पाहा-

आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---