भारताचा सलामीवीर रोहित शर्माने विराट कोहली, शिखर धवन, हार्दिक पंड्या आणि केएल राहुलची जोरदार फिरकी घेतली आहे. त्यासाठी रोहितने ट्विटरचा सहारा घेतला आहे.
रोहितने आज ट्विट करून खास फोटो शेअर केला आहे. ह्या फोटोच्या कोलाजमध्ये विराट कोहली, शिखर धवन, हार्दिक पंड्या आणि केएल राहुल हे डब्लूडब्लूई सुपरस्टार द ग्रेट खली बरोबर आहे. गेले ४-५ दिवस द ग्रेट खली बरोबरचे भारतीय क्रिकेटपटूसोबतचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
रोहित आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ” चांगला प्रयत्न आहे मित्रांनो, परंतु बेल्ट अर्थात विजेतेपद इकडे आहे. ”
रोहित शर्माला डब्लूडब्लूईचा खास बेल्ट डब्लूडब्लूईचा खेळाडू आणि सीओओ ट्रिपल एचने भेट म्हणून दिला होता.
https://twitter.com/ImRo45/status/895197244059668480
काय आहे डब्लूडब्लूई बेल्टचा किस्सा?
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने गेल्याच महिन्यात डब्लूडब्लूईचा खेळाडू आणि सीओओ ट्रिपल एचचे आभार मानले होते. ट्रिपल एचने मुंबई इंडियन्स संघासाठी खास गिफ्ट पाठवल्यानंतर रोहितने त्याचे आभार मानले होते.
यावर्षी मुंबई इंडियन्स हा आयपीएलचा विजेता ठरला. त्यानंतर २-३ दिवसांनी ट्रिपल एचने मुंबई इंडियन्सला एक खास गिफ्ट पाठवणार असल्याचं ट्विट केलं होत. दिलेल्या शब्दाप्रमाणे ट्रिपल एचने चॅम्पिअन्सचा बेल्ट मुंबई इंडियन्स संघासाठी १ महिन्यानंतर पाठवला होता. त्याबरोबरच एक संदेशही ट्रिपल एचने पाठवला होता.