मुंबई । इंग्लिश क्रिकेट बोर्ड यंदाच्या वर्षात महिला त्रिकोणीय वनडे मालिका भरविण्याच्या विचारात आहे. यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका या बोर्डाशी संपर्क साधत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाला इंग्लंडबरोबर तीन एक तीन वनडे आणि तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळायचे होते, पण ही मालिका कोरोनामुळे स्थगित करण्यात आली.
कोरोना महामारीमुळे मार्चमध्ये सर्व क्रीडा स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्या. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये महिलांची टी ट्वेंटी विश्वचषक ही सर्वात मोठी स्पर्धा पार पडली.
ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले की, ” सर्व गोष्टी नियोजनानुसार झाल्या तर आशा आहे की पुन्हा याच वर्षी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट होताना दिसून येईल. आम्ही इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका या महिला संघात तिरंगी मालिका भरवण्याच्या विचारात असून संबंधित बोर्डाशी संपर्क करत आहोत.
ते म्हणाले, “भारत कोरोना या विषाणूवर कसे नियंत्रण मिळवेल. यावरच या तिरंगी मालिकेचे नियोजन अवलंबून असणार आहे. कारण आशिया खंडात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. ते नियंत्रणात येण्याचे कोणतेच संकेत मिळत नाहीत.”
ब्रिटनमध्ये आतापर्यंत 2 लाख 85 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 40 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारतातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.