---Advertisement---

टीम इंडियाने एकेवेळी घरचा रस्ता दाखवलेला क्रिकेटर मनोज तिवारी झाला आमदार

---Advertisement---

क्रिकेटपटूंनी राजकारणात उतरणे हे भारतातच नाही जगासाठीही नवीन नाही. अनेक देशांचे दिग्गज क्रिकेटपटूंनी क्रिकेट कारकिर्दीनंतर किंवा क्रिकेट कारकिर्द सुरु असताना राजकारणातही पाऊल ठेवले आहे. आता यात भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारीचीही भर पडली आहे. पश्चिम बंगाल मध्ये सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या तिवारीने शिवपुरमध्ये विजय मिळवला आहे. त्याने भाजपाच्या डॉ. रतिन चक्रवर्ती यांना पराभूत करत राजकारणाच्या मैदानावर रॉयल एन्ट्री घेतली आहे.

शिवपुर मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या मनोज तिवारीने ३२३३९ मतांनी विजय मिळवला आहे. त्याने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडून भाजपा विरुद्ध कंबर कसली आहे. तसेच त्याची पत्नी सुश्मिताने देखील तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

मनोज तिवारीची क्रिकेट कारकीर्द
भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनोज तिवारीने आतापर्यंत एकूण १२ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याला २६.१ च्या सरासरीने २८७ धावा करण्यात यश आले आहे. यात १ शतक आणि १ अर्धशतकाचा समावेश आहे. यात त्याने ५ गडी देखील बाद केले आहेत. तसेच त्याने ३ टी-२० सामन्यात १५ धावा केल्या होत्या. परंतु दमदार कामगिरीनंतरही त्याला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. २०१५ साली त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

याबरोबरच प्रथम श्रेणी क्रिकेट बद्दल बोलायचं झालं तर, त्याने १२५ सामने खेळले होते. यात त्याला ५०.४ च्या सरासरीने ८९६६ धावा करण्यात यश आले होते. यात त्याने २८ शतक आणि ३७ अर्धशतक झळकावले होते. तसेच १६३ लिस्ट ए सामन्यात त्याने ५४६६ धावा केल्या होत्या. यात त्याने ६ शतक आणि ४० अर्धशतक झळकावले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

राजस्थान रॉयल्स संघात लिविंगस्टोनच्या जागी ‘या’ तरुण शिलेदाराची निवड, पाहा कशी राहिली आहे कारकिर्द

एमएस धोनीशी तुलना केली जाणाऱ्या ‘या’ पठ्ठ्याचे झाले आयपीएल पदार्पण, जाणून घ्या त्याच्याबद्दल

हीच का मुंबईकरांची खेळाडू वृत्ती? अंतिम षटकातील धवल कुलकर्णीच्या ‘त्या’ कृतीवर दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---