West Indies 4 Player Retire: वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाच्या अनिसा मोहम्मद, शकेरा सेलमन, किसिया नाइट आणि किशोना नाइट यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हे चार खेळाडू 2016 च्या टी20 विश्वचषक चॅम्पियन संघाचा भाग होते.
2003 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी ऑफ-स्पिनर अनिसा मोहम्मद (Anisa Mohammed) एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. तिने 141 एकदिवसीय सामन्यांमध्ये 180 विकेट्स आणि 117 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 125 विकेट्स घेतले आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 100 विकेट्स घेणारी ती पहिली क्रिकेटर (पुरुष किंवा महिला) आहे, तसेच टी-20 आंतरराष्ट्रीय हॅटट्रिक घेणारी पहिली वेस्ट इंडिज महिला क्रिकेटर आहे. (west indies 4 player announced their international retirement)
अनिसाने पाच एकदिवसीय विश्वचषक आणि सात टी-20 विश्वचषकांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले. तिने मार्च 2022 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, जो एकदिवसीय विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा उपांत्य सामना होता.
अनीसा मोहम्मद म्हणाली, “गेली 20 वर्षे अप्रतिम होती. मी प्रत्येक मिनिटाचा आनंद घेतला. चढ-उतार होते. मला विश्वास आहे की, माझ्या काळात माझ्याप्रमाणेच खेळापासून दूर जाण्याची आणि तरुणांना त्यांची स्वप्ने साकार करण्याची संधी देण्याची वेळ आली आहे. माझ्या कारकिर्दीत 258 वेळा संघाची जर्सी परिधान केल्याबद्दल मला खूप सन्मान वाटतो.”
तर मध्यमगती गोलंदाज शकेरा सेलमनच्या (Shakira Selman) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात 2008 मध्ये आयर्लंडविरुद्ध डब्लिन येथे झालेल्या एकदिवसीय सामन्याने झाली. तिने 100 एकदिवसीय सामन्यांमध्ये 86 आणि 96 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 51 विकेट्स घेतले आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत तिने वेस्ट इंडिजकडून शेवटचा सामना खेळला होता.
सेलमन म्हणाली, “मला दिग्गजांविरुद्ध खेळताना आनंद होतो. त्यापैकी काहींना बाद करण्यात मी भाग्यवान होते. लोकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणे हे माझे ध्येय आहे. मी माझ्या कारकिर्दीच्या पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करत असताना, माझे लक्ष नवीन मार्गांनी खेळाबद्दलची माझी आवड दाखवण्यावर राहील.”
किसिया आणि किशोना (Kisia Knight and Kishona Knight) या जुळ्या बहिणींनी अनुक्रमे 2011 आणि 2013 मध्ये वेस्ट इंडिजसाठी पदार्पण केले. यष्टीरक्षक फलंदाज किसियाने 87 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1327 धावा आणि 70 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 801 धावा केल्या आहेत. तर, मधल्या फळीतील फलंदाज किशोनाने 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये 851 धावा आणि 55 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 546 धावा केल्या आहेत. दोघांनी डिसेंबर 2022 मध्ये ब्रिजटाऊन येथे इंग्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला, जो त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.
नाइट म्हणाल्या, “हा आनंदी आणि अद्भुत प्रवासाचा शेवट आहे. आम्ही आमचे कुटुंब, मित्र, सहकारी आणि समर्थकांचे वर्षानुवर्षे सतत प्रेम दिल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झाले नसते आणि त्यासाठी आम्ही सदैव ऋणी राहू. शेवटी, आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आणि आयुष्यभरासाठी आठवणी निर्माण करू दिल्याबद्दल क्रिकेट वेस्ट इंडिजचे आभार.” (An earthquake in West Indies cricket four players announced their retirement at the same time)
हेही वाचा
IND vs AFG: रोहित-नबी वादावर आर अश्विनची लक्षवेधी प्रतिक्रिया, म्हणाला, ‘आम्ही तिथे असतो तर…’
‘मी सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही…’, रोहित शर्माचे टी20 विश्वचषक संघ निवडीबाबत मोठे विधान