पाकिस्तानचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान संघात नुकतीच ४ सामन्यांची टी२० मालिका पार पडली. ही मालिका संपल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून खेलाडूवृत्त्तीचे दर्शन चाहत्यांना घडले.
या मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी गयानाच्या प्रोविंडस स्टेडियममध्ये खेळला जाणार होता. मात्र, हा सामना पावसामुळे ३ षटकांनंतर रद्द करण्यात आला. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांना आपल्या जर्सी दिल्या. याचे फोटो वेस्ट इंडिजच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आले आहेत.
या फोटोंमध्ये दिसते की पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमच्या हातात ख्रिस गेलची जर्सी आहे. तर दुसऱ्या फोटोत वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोच्या हातात बाबर आजमची जर्सी दिसत आहे. यातील एका फोटोमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम वेस्टइंडीजचा खेळाडू निकोलस पूरन सोबत चर्चा करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CSH61nzHK2C/
ही टी-20 मालिका ड्वेन ब्रावोसाठी खास होती, कारण कॅरेबियन भूमीत त्याची वेस्ट इंडीजसाठी ही शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका होती. तो आगामी टी-20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने सांगितले आहे.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघांमध्ये अगोदर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार होती. पण कोरोनाच्या कारणास्तव त्यातील एक सामना कमी करण्यात आला होता.
या टी-20 मालिकेत केवळ एक टी-20 सामना होऊ शकला. अन्य तिन्ही सामने पावसामुळे रद्द करावे लागले. या मालिकेत केवळ दुसऱ्या टी-20 सामन्याचा निकाल लागला. या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 157 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रतिउत्तरादाखल वेस्ट इंडिजला 20 षटकात 4 बाद 150 धावाच करता आल्या. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना 7 धावांनी जिंकला. त्याचबरोबर मालिकेतील अन्य तिन्ही सामने रद्द झाल्याने पाकिस्तानने ही मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘द हंड्रेंड’मध्ये पुन्हा एकदा जेमिमा रॉड्रिग्जची वादळी खेळी, स्पर्धेत तिसऱ्यांदा झळकावले अर्धशतक