इंग्लंड क्रिकेट संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघात 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले जाणार आहेत. या दौऱ्याला 3 डिसेंबरपासून वनडे मालिकेने सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघात संधी न मिळालेला अनुभवी फलंदाज डॅरेन ब्राव्हो याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
Darren Bravo announces on social media that he will be stepping back from cricket due to his exclusion from West Indies selection pic.twitter.com/wWVXcmWr4q
— Caribbean Cricket Podcast (@CaribCricket) November 26, 2023
सध्या वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड खराब अवस्थेतून जात असताना संघात काही अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, ब्राव्हो याला संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट लिहित त्याने हा आपला निर्णय सार्वजनिक केला. आपल्याला सातत्याने डावले जात असल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
https://www.instagram.com/p/C0FrtlLrpJZ/?igshid=MzRlODBiNWFlZA==
आपल्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याने 56 कसोटी, 122 वनडे व 26 टी20 सामने खेळले. यामध्ये त्याने सात हजार पेक्षा जास्त धावा केला. 34 वर्षीय ब्राव्हो आता जगाभरात टी20 क्रिकेट खेळताना दिसेल.
(West Indies Bateer Darren Bravo Annouced Retirement From International Cricket After Ignored By Selection Committee)
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पूर्ण, भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने केली भावनिक पोस्ट
ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘भारतीय फलंदाजांपेक्षा…’