वेस्ट इंडीज संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना वेस्ट इंडीजने रविवारी (28 जानेवारी) 8 धावांनी जिंकला. रोमांचक सामन्यात मोठा उलटफेर झाल्याने चाहत्यांसाठी हा पैसा वसून अनुभव होता. एक दिवस आधी दुकापतग्रस्त झालेला शमार जोसेफ वेस्ट इंडीजसाठी मॅच विनर ठरला. त्याने घेतलेल्या 7 विकेट्सच्या जोरावर वेस्ट इंडीजने मालिका 1-1 अशा बसोबरीत सोडवली. सोबतच सामनावीर पुरस्कार देखील त्यालाच दिला गेला.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी या सामन्यात शेवटच्या डावात 216 धावांचे लक्ष्य मिळाले होते. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य गाठताना 2 विकेट्सच्या नुकसानावर 60 धावा केल्या होत्या. स्टीव स्मिथ (33*) आणि कॅमरून ग्रीन (9*) यावेळी खेळपट्टीवर कायम होते. दुसऱ्या दिवशी या दोघांनी संयमी खेळ दाखवत संघाला चांगली सुरुवात दिली. तिसऱ्या विकेटसाठी ग्रीन आणि स्मिथमध्ये 71 धावांची भागीदारी देखील झाली. पण असातच शमार जोसेफ याने 31 व्या षटकात ग्रीनला वैयक्तिक 42 धावांवर बाद केले. षटकातील पाचव्या चेंडूवर ग्रीन, तर शेवटच्या चेंडूवर जोसेफने ड्रेविस हेड याची शिकार केली. हेड शुन्यावर बाद झाला.
त्यानंतर मिचेल मार्ष 35व्या षटकात वैयक्तिक 10 धावा करून बाद झाला. यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स केरी देखील 2 धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्क याच्या रुपात जोसेफला आपली वाचवी विकेट मिळाली. 41व्या षटकात स्टार्क 21 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार पॅठ कमिन्स 2 धावा करून 43व्या षटकात बाद झाला. डावात 48व्या षटकात पुन्हा जोसेफ गोलंदाजीला आला आणि त्याने फिरकीपटू नाथन लायनल 9 धावांवर बाद केले. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 9 बाद 191 धावा रोहीत. विजयापासून अवघ्या काही अंतरावर असताना जोस हेजलवूड (0) याच्या रुपात इंग्लंडने आपली शेवटची विकेट देखील गमावली. दुसरीकडे स्टीव स्मिथ मात्र जोसेफ किंवा इतर कोणत्याची कॅरेबियन गोलंदाजाची शिकार बनला नाही. स्मिथने वैयक्तिक 33 धावांपासून चौथ्या दिवसाची सुरुवात केली होती. दिवसाखेर सलामीवीर फलंदाजने 91* धावांचे योगदान दिले. पण ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
Yesterday – Hospital due to injured toe.
Today – Created history at Gabba.
Shamar Joseph, Take a bow – he has given a new life to West Indies Test cricket. 🫡 pic.twitter.com/2XeYWhlGnT
— Johns. (@CricCrazyJohns) January 28, 2024
वेस्ट इंडीजसाठी दुसऱ्या डावात शमार जोसेफ याने 11.5 षटकांमध्ये 68 धावा खर्च करून 7 विकेट्स घेऊ शकला. जोसेफचे कसोटी पदार्पणाच्या मालिकेतील हे प्रदर्शन नक्कीच वेस्ट इंडीज संघ आणि चाहत्यांसाठी खास ठरले. अर्जारी जोसेफ याने 17 षटकांमध्ये 62 धावा खर्च करून 2, तर जस्टिन ग्रीव्हज याने 12 षटकात 46 धावा खर्च करून एक विकेट घेतली. केमार रोच याने 10 षटकात 28 धावा खर्च केल्या. पण एकही विकेट त्याला मिळाली नाही.
तत्पूर्वी या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीज संघ 311 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 289 धावांवर 9 बाद असताना डाव घोषित केला. कर्णधार पॅट कमिन्सचा हा निर्णय धाडसी ठरला. पण दुसऱ्या डावात वेस्ट इंडीजला ऑस्ट्रेलियाने 193 धावांवर गुंडाळल्याने हा निर्णय काही प्रमाणात योग्य देखील ठरला. शेवटच्या डावात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळालेले 216 धावांचे लक्ष्य जास्त मोठे नव्हते. पण कॅरेबियन गोलंदाजांनी जयमान संघाला पराभूत करण्याचा निर्धार केला होता आणि ते शक्य देखील करून दाखवले. (West Indies beat Australia by 8 runs at the Gabba)
महत्वाच्या बातम्या –
Australia Open । आर्यना सबालेंका पुन्हा बनली टेनिस कोर्टची राणी, दुसऱ्यांदा जिंकले ग्रँड स्लॅम
Australia Open । बोपन्नाच्या कामगिरीने उंचावली भारतीयांची मान, 43 व्या वर्षी ऑस्ट्रेलिया ओपन केला महाविक्रम