आयसीसी टी20 विश्वचषक 2024 च्या 26 व्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडवर रोमांचक विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना कॅरेबियन संघाने 150 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, किवी संघ केवळ 136 धावाच करू शकला. वेस्ट इंडिजनं यंदाच्या विश्वचषकात सलग तीन सामन्यांत विजय मिळवून हॅट्रिक केली आहे. यासोबतच कॅरेबियन संघ सुपर-8 साठी पात्र ठरला. तर या पराभवानंतर किवी संघ अडचणीत आला आहे. स्पर्धेत हा त्यांचा दुसरा पराभव आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजकडून उत्कृष्ट गोलंदाजीचा नमूना पाहायला मिळाला. वेस्ट इंडिजचा संघ न्यूझीलंडला ठरविक अंतरावर धक्के देत राहिला, ज्यामुळे न्यूझीलंड धावांचा पाठलाग करण्यासाठी अयशस्वी ठरला. वेस्ट इंडिज कडून शेरफेन रदरफोर्डने निर्णायक खेळी खेळली. त्यानी 39 चेंडूत नाबाद 68 धावा ठोकल्या. आपल्या या खेळीत त्यानं 2 चौकार आणि 6 उत्तुंग षटकार हाणले.
त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो त्यांच्यावरच उलटला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 9 बाद 149 धावा केल्या. किवी गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली आणि 30 धावांच्या स्कोअरवर 5 विकेट्स घेतल्या होत्या. पण इथून शेरफेन रदरफोर्डने शानदार खेळी करत वेस्ट इंडिजला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले, जे त्यांच्या विजयासाठी पुरेसे ठरले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला मयार्दित 20 षटकांत 136/9 एवढीच धावसंख्या गाठता आली.
धावांचा पाठलाग करताना किवी संघाची सुरुवात निराशाजनक झाली. ग्लेन फिलिप्सने संघाकडून सर्वाधिक 40 धावा केल्या. या व्यतीरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. कॅरेबियन गोलंदाजांसमोर किवी संघ ढेपाळला. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने सर्वाधिक 4 बळी घेतले. त्याने 4 षटकात केवळ 19 धावा दिल्या. याशिवाय फिरकीपटू गुडकेश मोतीने 3 विकेट्स घेतल्या. यश अकिल हुसेन आणि आंद्रे रसेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
महत्तवाच्या बातम्या-
भारताच्या विजयाचा पाकिस्तानला फायदा! सुपर-8 चं समीकरण बनलं आणखी रोमांचक
टी20 विश्वचषकादरम्यान भारतीय संघासाठी वाईट बातमी, वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे 3 महिन्यांसाठी बाहेर
मोक्याच्या क्षणी सूर्या आला फॉर्ममध्ये! सर्व टीकाकारांची बोलती बंद