वेस्टइंडिजच्या सबिना पार्क स्टेडियममध्ये वेस्टइंडिज विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती. परंतु, वेस्टइंडिज संघातील ११ व्या क्रमांकाच्या खेळाडूने पाकिस्तान संघातील तोंडचा खास हिसकावून घेतला आणि अप्रतिम खेळी करत वेस्टइंडिज संघाला विजय मिळवून दिला.
वेस्टइंडिज संघाने मालिकेतील पहिल्याच सामन्यात १ गडी राखून विजय मिळवला. हा विजय वेस्टइंडिज क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा असा विजय आहे, ज्यामध्ये वेस्टइंडिज संघाने १ गडी राखून कसोटी सामना जिंकला आहे. २००० साली देखील वेस्टइंडिज संघाने १ गडी राखून विजय मिळवण्याचा कारनामा केला होता. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाला वेस्टइंडिज संघाने जोरदार प्रारंभ केला आहे. वेस्टइंडिजच्या जेडेन सील्सने हा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
या सामन्यात जेडेन सील्सने गोलंदाजी करताना ५ गडी बाद केले. यासह वेस्टइंडिज संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये ५ गडी बाद करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तान संघाने दिलेल्या १६८ धावांचा पाठलाग करताना त्याने अवघ्या १३ चेंडूंचा सामना केला. परंतु, हीच १३ चेंडूंची खेळी त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळींपैकी एक ठरली आहे.
११ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जेडेन सील्सने आक्रमक आणि वेगवान गोलंदाजी करत असलेल्या पाकिस्तानी गोलंदाजांचा निडर होऊन सामना केला. यासह केमार रोच सोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी करून वेस्टइंडिज संघाला विजय मिळवून दिला. (West Indies beat Pakistan by 1 wicket, roach and seales inspire west indies in last wicket thriller)
जेडेन सील्स आणि रोचने मिळवून दिला वेस्टइंडिज संघाला विजय
हा सामना जिंकण्यासाठी वेस्टइंडिज संघाला १६८ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करत असताना ब्लॅकवूडच्या ५५ धावांच्या खेळी व्यतिरिक्त इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. शेवटी केमार रोच आणि जेडन सिल्स यांनी मिळून वेस्टइंडिज संघाला विजय मिळवून दिला. केमार रोचने या डावात ५२ चेंडूंमध्ये २ चौकारांच्या साहाय्याने नाबाद ३० धावांची खेळी केली तर सिल्सने १३ चेंडूंमध्ये नाबाद २ धावांची खेळी केली होती.
हा सामना वेस्टइंडिज संघाने १ गडी राखून आपल्या नावावर केला. या सामन्यात ५ गडी बाद करणाऱ्या सिल्सला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. यासह २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्टइंडिज संचाने १-० ने आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधारानेच टिपला कर्णधाराचा झेल; कोहलीचा आनंद गगनात मावेना, पाहा व्हिडिओ
शमी-बुमराहची फलंदाजी पाहून सेहवागला आठवली ‘त्या’ दोन दिग्गजांची झुंजार खेळी
‘खासच!’ बेअरस्टो बाद होताच विराट-रोहितने घेतलेली गळाभेट पाहून चाहते झाले खुश, व्हिडिओ व्हायरल