ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात शुक्रवारी (21 ऑक्टोबर) पहिल्या फेरीत ब गटामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड यांच्यात सामना खेळला गेला. होबार्ट येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात आयर्लंडने बाजी मारली. त्यांनी वेस्ट इंंडिजला तब्बल 9 गड्यांनी पराभूत करत टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 मध्ये प्रवेश केला. या पराभवा सोबतच दोन वेळा टी20 विश्वचषक ट्रॉफी उंचावणाऱ्या वेस्ट इंडीज संघाला मानहानीकारकरित्या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. या पराभवानंतर बोलताना वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने आपल्या फलंदाजांवर या पराभवाचे खापर फोडले.
मुख्य फेरीत प्रवेश करण्यासाठी केवळ विजयाचीच आवश्यकता असलेल्या या सामन्यात आयर्लंडने जबरदस्त खेळ दाखवत वेस्ट इंडीजला स्पर्धे बाहेर केले. 147 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडने केवळ एक गडी गमावत हे आव्हान पार केले. स्पर्धेतील संघाच्या एकूण कामगिरीवर बोलताना पूरन म्हणाला,
“सर्वप्रथम मी आयर्लंड संघाचे अभिनंदन करेल. त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीत उत्कृष्ट खेळ दाखवला. ते विजयाचे हकदार होते. आमच्या फलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेत चांगली फलंदाजी केली नाही. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर आम्ही केवळ 146 धावा करू शकलो. आम्ही स्वतःला आणि आमच्या चाहत्यांना देखील नाराज केले आहे. मी स्वतः देखील अजिबात अपेक्षित कामगिरी करू शकलो नाही.”
पूरनने यावेळी संघाचा अनुभवी अष्टपैलू जेसन होल्डर, फलंदाज ब्रँडन किंग व युवा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ यांचे कौतुक केले. वेस्ट इंडीजची या स्पर्धेतील सुरुवात अतिशय खराब झाली होती. स्कॉटलंडने त्यांना पहिल्याच सामन्यात मात दिलेली. त्यानंतर झिम्बाब्वेला पराभूत करत त्यांनी स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले होते. मात्र, निर्णायक सामन्यात त्यांना पुन्हा एकदा अपयश आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघाच्या जर्सीत दिसला रोहित शर्मा! पाहा नक्की काय आहे प्रकरण
आशिया चषक 2023 विषयी रॉजर बिन्नींची पहिली प्रतिक्रिया, दिले स्पष्ट उत्तर