---Advertisement---

“आम्ही चुकलो तर शिक्षा, पण त्यांना काही बोलू नका” पराभवानंतर अंपायरच्या निर्णयावर भडकला कर्णधार

---Advertisement---

West Indies vs Australia Test Series: रोस्टन चेसच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांना 159 धावांनी पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिज संघाच्या या पराभवापेक्षा हा सामना थर्ड अंपायरने दिलेल्या काही वादग्रस्त निर्णयांमुळे चर्चेत राहिला, (Cricket controversial decisions) ज्याबद्दल सामन्यानंतर विंडीजच्या कर्णधाराच्या वक्तव्यातही नाराजी दिसून आली. चेसने पहिला कसोटी सामना हरल्यानंतर पत्रकार परिषदेत अंपायरच्या निर्णयांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि ते निराशाजनक असल्याचे म्हटले.

वेस्ट इंडिज कसोटी संघाचा कर्णधार रोस्टन चेसने बार्बाडोस कसोटी सामना संपल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “जेव्हा आम्ही खेळाडू चुका करतो, तेव्हा आम्हाला कठोर शिक्षा दिली जाते. तर अधिकाऱ्यांसाठी या बाबतीत कोणतेही नियम नाहीत. ते फक्त एक चुकीचा किंवा वादग्रस्त निर्णय घेतात आणि त्यांच्या आयुष्यावर कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही खेळाडूंच्या कारकिर्दीबद्दल बोलत आहात. एक चुकीचा निर्णय एखाद्या खेळाडूच्या कारकिर्दीत खूप मोठी भूमिका बजावू शकतो, ज्यात तो करिअर घडवणारा किंवा बिघडवणारा ठरू शकतो. याच प्रकारे अधिकाऱ्यांसाठी चुकीच्या निर्णयांवर काहीतरी नियम असायला हवेत.” (Roston Chase angry)

आपल्या निवेदनात रोस्टन चेझ पुढे म्हणाला की, “मी आणि शाई होप जेव्हा पहिल्या डावात चांगली कामगिरी करत होतो आणि आम्हाला मोठी आघाडी घेण्याची संधी होती, पण त्यानंतर काही संशयास्पद निर्णय झाले. यामुळे आम्ही मोठी आघाडी घेऊ शकलो नाही. हे स्पष्ट आहे की या निर्णयांबद्दल कोणालाही चांगले वाटणार नाही. तुम्ही जिंकण्यासाठी खेळता, त्यासाठी तुम्ही मैदानावर तुमचे सर्वस्व देता आणि असे वाटते की सर्वजण तुमच्या विरोधात आहेत.” (Roston Chase statement)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---