---Advertisement---

काय सांगता! इंग्लंड दौऱ्यावर गेलेला वेस्ट इंडिज संघ स्वत:च्याच देशातील खेळाडूंशी करणार दोन हात

On: मंगळवार, जून 23, 2020 3:40 PM
---Advertisement---

मुंबई ।वेस्टइंडीजच्या संघाने इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर आपला चौदा दिवसांचा क्वारंटाइन सोमवारी पूर्ण केला. आता वेस्ट इंडीजचा संघ तीन दिवसीय सराव सामना खेळून पुढील महिन्यात होणाऱ्या 3 सामन्याच्या कसोटी मालिकेच्या तयारीला सुरुवात करणार आहे. वेस्ट इंडीजचा संघ नऊ जून रोजी एका विशेष विमानाने मँचेस्टर येथे पोहचला होता. त्यानंतर सर्व खेळाडू ओल्ड ट्रॅफर्ड मैदान जवळ असलेल्या हॉटेलमध्ये क्वारंटाइनमध्ये होते.

वेस्ट इंडीज 25 सदस्यांचा संघ घेऊन इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. यात अकरा खेळाडू राखीव आहेत. कोणत्या खेळाडूला दुखापत झाली अथवा कोरोनाने बाधित झाल्यास त्याच्या जागी पर्यायी खेळाडू निवडता येईल. यासाठी अतिरिक्त खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. कॅरेबियन संघ आपल्याच खेळाडूंबरोबर आता तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. परदेशात आपल्याच संघाविरोधात कदाचीत पहिल्यांदाच एखादा संघ सराव सामना खेळणार आहे.

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला कसोटी सामना 8 जुलै रोजी एजेस बाऊल येथे खेळवला जाणार आहे. दुसरा आणि तिसरा कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर होणार आहे. हे तीनही कसोटी सामने एकवीस दिवसांत खेळवण्यात येणार आहे.

आयसीसीच्या नव्या नियमानुसार ही कसोटी मालिका होणार आहे. नव्या नियमानुसार कोणत्याही गोलंदाजाला चेंडूस लाळ लावता येणार नाही. ही कसोटी मालिका पाहण्यासाठी दर्शकांना परवानगी देण्यात आली नाही. या मालिकेदरम्यान खेळाडू आणि स्टाफच्या आरोग्याची सतत तपासणी करण्यात येणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वेस्ट इंडीजचे तीन प्रमुख खेळाडू डॅरेन ब्रावो, शिमरोन हेटमेयर आणि कीमो पॉल यांनी या दौऱ्यास जाण्यास नकार दिला. वास्तविक पाहता हा दौरा मे-जून महिन्यात होणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही मालिका पुढे ढकलण्यात आली.

वेस्टइंडीजचा कसोटी संघ:

जेसन होल्डर (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड, नक्रुमा बोनर, क्रैग ब्रॅथवेट, शमर ब्रूक्स, जॉन कँपबेल, रोस्टन चेज, रकीम कॉर्नवाल, शेन डाउरिच, केमार होल्डर, शाई होप, अल्जारी जोसेफ, रेमन रीफर आणि केमार रोच

राखीव खेळाडू  :

सुनील अंबरीस, जोशुआ डासिल्वा, शॅनन गेब्रियल, कीन हार्डिंग, काइल मेयर, प्रेस्टन मॅकस्वीन, मार्क्विनो मिंडले, शाइनी मोसले, एंडरसन फिलिप, ओशेन थॉमस आणि जोमेल वार्रिकान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---