आयसीसीने कसोटी क्रिकेट लोकप्रिय करण्यासाठी कसोटी चॅम्पियनशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचा अंतिम सामना २०२१ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाईल.
या कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ज्या दोन संघांचे गुण सर्वात जास्त असतील त्या दोन संघांना स्थान मिळेल. त्यामुळे सध्या अनेक मोठ्या संघांमध्ये यासाठी स्पर्धा आहे. त्यात इंग्लंडचाही संघ आहे. परंतु सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मैदानांत चालू असलेल्या कसोटी मालिकेत जर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले तर त्यांचे अंतिम सामन्यात खेळण्याचे स्वप्न भंग होऊ शकते.
इंग्लंडला जिंकावी लागेल वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका
कोरोना विषाणूमुळे आयसीसीद्वारा सुरू झालेल्या कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. पण या लॉकडाऊनच्या काळात इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिका सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिज संघाने जिंकला.
आतापर्यंत झालेल्या कसोटी चॅम्पियनशिपच्या सामन्यांनुसार गुणतालिकेमध्ये इंग्लंडचा संघ १४६ गुणांसह ४थ्या स्थानावर आहे. इंग्लंड संघाने कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असलेली अॅशेस मालिका प्रथम २-२ बरोबरीत केली आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव केला. पण तरीही ते गुणांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे यानंतरच्या प्रत्येक सामन्यात त्यांना चांगली कामगिरी करत गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.
गुणतालिकेमध्ये भारतीय आहे संघ पहिल्या क्रमांकावर
कसोटी चॅम्पियनशिपच्या प्रत्येक मालिकेसाठी १२० गुण मिळतात. किती सामन्यांची मालिका आहे त्यानुसार प्रत्येक सामन्याचे गुण वाटप केले आहे. इंग्लंड-वेस्ट इंडीज मालिका ३ सामन्यांची आहे. ज्यामुळे सामना जिंकणाऱ्या संघाला ४० गुणांची कमाई होते. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने सामना जिंकून गुणतालिकेमध्ये आपले खाते उघडले.
-असे मिळणार कसोटी चॅम्पियनशिपमध्ये संघांना गुण
इंग्लंडचा संघ अद्याप १४६ गुणांवर आहे. सध्या भारतीय संघ ४ मालिकांनंतर ३६० गुणांनी पहिल्या स्थानावर आहे. तर ३ मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ २९६ गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. या मालिकेत जर इंग्लंडला वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला तर या दोन्ही संघांच्या तुलनेत इंग्लंड खूप मागे राहील.
इंग्लंडची पुढील मालिका भारत आणि पाकिस्तानबरोबर
सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंडला पाकिस्तान विरुद्ध खेळावे लागेल. ज्यासाठी पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. नंतर इंग्लंडला भारतीय भूमीवर भारताविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका जिंकणे इंग्लंडला फार कठीण असेल. याचबरोबर इंग्लंडला श्रीलंकेविरुद्ध पुढे ढकललेली मालिकाही खेळावी लागणार आहे. त्यामुळे इंग्लंडचा पुढील प्रवास तितकासा सोपा असणार नाही. त्यामुळे त्यांना चांगली कामगिरी करण्याशियाव गत्यंतर नाही.
वाचनीय लेख –
हे ३ संघ जिंकू शकतात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
आयपीएलमध्ये युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली खेळलेले ४ दिग्गज कर्णधार; गांगुलीचाही आहे समावेश
हेन्री ओलोंगा: थेट आपल्याच देशाच्या राष्ट्रपतीला भिडलेला क्रिकेटर