---Advertisement---

टीम इंडियाविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी असा आहे विंडीज संघ

On: शुक्रवार, नोव्हेंबर 29, 2019 1:08 PM
---Advertisement---

पुढील महिन्यात भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकांसाठी गुरुवारी वेस्ट इंडीज संघाची निवड करण्यात आली आहे.

भारत विरुद्धच्या वनडे आणि टी20 या दोन्ही मालिकेत वेस्ट इंडीजचे नेतृत्त्व अष्टपैलू किरॉन पोलार्ड करेल. त्याचबरोबर निकोलस पूरन टी20 मालिकेत उपकर्णधारपदाची आणि शाय होप वनडे मालिकेतत उपकर्णधारपदाची सूत्रे सांभाळेल.

वेस्ट इंडीजच्या टी20 संघात फॅबिअय ऍलेनला गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर स्थान मिळवण्यात यश आले आहे.

मात्र आक्रमक फलंदाज ख्रिस गेल वनडे आणि टी20 दोन्ही मालिकेतून बाहेर आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच तो क्रिकेटमधून विश्रांती घेत असल्याचे सांगितले होते. तसचे काही दिवसांपूर्वी निवृत्तीतून माघार घेण्याचे संकेत दिलेल्या ड्वेन ब्रावोलाही वेस्ट इंडीजच्या संघात स्थान मिळालेले नाही.

पण 2020 ला ऑस्ट्रेलियात आणि 2021 ला भारतात होणाऱ्या टी20 विश्वचषकाचा विचार करता वेस्ट इंडीजने ब्रेंडन किंग आणि हेडन वॉल्श ज्यूनियर अशा युवा खेळाडूंना वनडे आणि टी20 संघात संधी दिली आहे.

वेस्ट इंडीजने नुकतेच लखनऊ येथे अफगाणिस्तान विरुद्ध 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळली आहे. यामध्ये वनडेत 3-0 असा विजय मिळवला. तर टी20 मध्ये त्यांना अफगाणिस्तानकडून 2-1 असा पराभव स्विकारावा लागला आहे.

त्याचबरोबर अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातही वेस्ट इंडीजने आज(29 नोव्हेंबर) 9 विकेट्सने विजय मिळवला आहे.

आता या मालिकेंनंतर वेस्ट इंडीज 6 डिसेंबरपासून भारताविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. तर त्यानंतर 15 डिसेंबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होईल.

भारताविरुद्धच्या मालिकांबद्दल वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमन्स म्हणाले, “आम्ही प्रत्येक प्रकारात(वनडे आणि टी20) तीन सामने खेळू. त्यामुळे आमच्या प्रत्येक संघाला भारताविरूद्ध खेळण्याची संधी मिळावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही अफगाणिस्तानचा अनादर करत नाही आहोत, परंतु भारताविरुद्ध खेळणे अधिक कठीण आहे, विशेषत: वनडेमध्ये.”

तसेच सिमन्स टी20 विश्वचषकाबद्दल म्हणाले, ‘पुढील टी20 विश्वचषक 2020 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. यानंतर 2021 टी20 विश्वचषक भारतात होणार आहे. यासाठी आम्हाला बरीच तयारी करावी लागेल.’

‘पण पहिली तयारी ऑस्ट्रेलियाची आहे. त्यामुळे आम्ही या मालिकेत अनेक खेळाडूंना संधी देत ​​आहोत. आम्हाला माहित आहे की आमच्याकडे बाहेर बसलेले खेळाडू देखील आहेत. पण ते नंतर संघात येऊ शकतात, म्हणून आत्ता येथे असलेल्यांना आणखी एक संधी देणे चांगले आहे.’

भारताविरुद्धच्या मालिकांसाठी असे आहेत संघ – 

टी20 संघ: फॅबियन ऍलन, शेल्डन कोट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, ब्रेंडन किंग, एव्हिन लुईस, कीमो पॉल, खॅरी पिएर, किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन, डेनेश रामदिन, शेरेफेन रदरफोर्ड, लेन्डल सिमन्स, हेडन वॉल्श ज्यूनियर, केस्रिक विल्यम्स

वनडे संघ: सुनील अँब्रिस, रोस्टन चेस, शेल्डन कोट्रेल, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाय होप, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, एव्हिन लुईस, कीमो पॉल, खॅरी पिएर, किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड, हेडन वॉल्श जूनियर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---