---Advertisement---

वनडे क्रिकेटमधला ‘हा’ स्टार खेळाडू कसोटीमध्ये ठरतोय ‘फेल’, संघातून बाहेर…

On: सोमवार, जुलै 20, 2020 8:15 PM
---Advertisement---

मुंबई । यष्टीरक्षक फलंदाज शाई होप याच्याकडून वेस्ट इंडिजचा संघ चांगल्या कामगिरीची अपेक्षा असतो. मात्र मात्र नेहमी तो अपयशी ठरतो. वनडे आणि टी -20 क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून वेस्ट इंडीज संघात स्थान निश्चित करणार्‍या शाई होपला कसोटी क्रिकेटमध्येही संधी दिली जात आहे, परंतु त्याला संधींचा त्याला सोनं करता येत नाही. हे आम्ही म्हणत नाही, तर त्यांची आकडेवारीदेखील याची साक्ष देत आहे.

1 मे 2015 रोजी शाई होपने वेस्ट इंडिजकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यास पाच वर्षे झाली, परंतु तो कसोटी क्रिकेटमध्ये सातत्य दाखवू शकला नाही. केवळ एकाच सामन्यात तो वेस्ट इंडिजचा नायक ठरला आहे, पण कारकीर्दीत खेळलेल्या 33 कसोटी सामन्यांपैकी ३२ मध्ये तो बहुधा अपयशी ठरला आहे. इंग्लंड दौर्‍यावर जाण्यापूर्वीच त्याने आपली कामगिरी सुधारण्याची ग्वाही दिला होता पण तसे झाले.

शाई होप सध्या इंग्लंड विरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावात तो 25 धावा करू शकला. पहिल्या डावात त्याने 64 चेंडूंत 16 धावां काढून बाद झाला तर दुसऱ्या डावात तो 23 चेंडूत 9 धावा काढून बाद झाला. तथापि, हा सामना वेस्ट इंडीजने जर्माेन ब्लॅकवुडच्या डावाच्या जोरावर जिंकला होता, परंतु दुसर्‍या सामन्याच्या पहिल्या डावात शाई होप त्याच अवस्थेत राहिला आणि 25 धावांवर बाद झाला.

आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्याने 33 कसोटी सामन्यांच्या 61 डावात फक्त दोन शतके ठोकली आहेत. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकाच सामन्यात त्याने ही दोन शतके ठोकली होती. या व्यतिरिक्त त्याने कसोटीत 5 अर्धशतकेही झळकावली आहेत पण कसोटी क्रिकेटनुसार ही आकडेवारी खूप वाईट आहे. कारण शाई होपने स्वत: वनडे क्रिकेटमध्ये 9 शतके आणि 17 अर्धशतके झळकावली आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 52 पेक्षा जास्त आहे, परंतु कसोटी क्रिकेटमध्ये होपची सरासरी 27 पेक्षा कमी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---