ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना गाबा येथे खेळला जात आहे. या सामन्यात कॅरेबियन संघ चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात आठव्या विकेटसाठी मोठी भागीदारी केल्याने पाहुणा संघ दडपणाखाली आला. कांगारू संघाच्या पहिल्या पाच विकेट झटपट पडल्या, केविन सिंक्लेअर याने वेस्ट इंडिजला आठवी विकेट्स मिळवून दिली. सिंक्लेअरची कसोटी फॉरमॅटमधील ही पहिली विकेट होती आणि त्याने ज्या पद्धतीने सेलिब्रेश केले ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
खरं तर, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्यांच्या 7 विकेट 161 धावांवर पडल्या होत्या. यानंतर उस्मान ख्वाजा आणि कर्णधार पॅट कमिन्स यांच्यात आठव्या विकेटसाठी मजबूत भागीदारी झाली. ही भागीदारी तोडणे वेस्ट इंडिजसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. त्यानंतर केविन सिंक्लेअर ( Kevin Sinclair) याने उस्मान ख्वाजाला स्लिपमध्ये झेलबाद केले आणि कसोटीमधील पहिली विकेट घेतली. विकेट घेतल्यानंतर सिंक्लेअर खूप उत्साहित झाला आणि गुलाटीगत हवेत उड्या घेत खास सेलिब्रेशन केले.
Cartwheel celebration by Kevin Sinclair after taking his first Test wicket. 🔥🤯pic.twitter.com/wftfxUAtMa
— Johns. (@CricCrazyJohns) January 26, 2024
विशेष म्हणजे या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कावेम हॉज (71), जोशुआ डी सिल्वा (79) आणि सिंक्लेअर (50) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाहुण्या संघाने आपल्या डावात 311 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तराच्या डावात, ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 289/9 वर घोषित केला आणि वेस्ट इंडिज 22 धावांनी आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियासाठी ख्वाजाने सर्वाधिक 75 धावा केल्या, तर वेस्ट इंडिजसाठी अल्झारी जोसेफने 84 धावांत 4 विकेट्स घेतल्या.
सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा क्रेग ब्रॅथवेटच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 1 विकेट्स गमावून 13 धावा केल्या. ब्रॅथवेट 3 धावा करून क्रीजवर आहे आणि वेस्ट इंडिजची आघाडी 35 धावांपर्यंत वाढली आहे. (West Indies player celebrates unique celebration after getting first wicket in Test, watch video)
हेही वाचा
IND vs ENG: रोहित शर्माने रचला इतिहास, भारतासाठी असा कारणामा करणारा ठरला चौथा खेळाडू
मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर शोएब मलिकने सोडले मौन, संघ सोडून दुबईला जाण्याचे सांगितले मुख्य कारण