आयपीएल 2024 मध्ये सुनील नारायणची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. वेस्ट इंडिजचा हा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीशिवाय फलंदाजीतही आपलं कौशल्य दाखवतोय.
सुनील नारायणनं या हंगामात आतापर्यंत 6 सामन्यात 46 च्या सरासरीनं 276 धावा ठोकल्या आहेत. सलामीवीर म्हणून त्यानं कोलकाता नाईट रायडर्सला जवळपास प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात करून दिली. विशेष म्हणजे, नारायण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सध्या पाचव्या स्थानावर आहे. मात्र या चमकदार कामगिरीनंतर आता तो टी20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजच्या संघात पुनरागमन करणार का? तो संघात परतला तर टी20 विश्वचषकासाठी कॅरेबियन टीम कशी असेल? चला तर मग जाणून घेऊया.
टी20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज संघाची कमान रोव्हमन पॉवेलकडे असू शकते. याशिवाय संघात ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स आणि शिमरॉन हेटमायरसारख्या फलंदाजांचा समावेश होऊ शकतो. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून आंद्रे रसेल, जेसन होल्डर आणि रोमॅरियो शेफर्ड यांना संधी मिळू शकते. या संघात गोलंदाजीची जबाबदारी अल्झारी जोसेफ, सुनील नारायण, औकिल हौसेन, शेमार जोसेफ आणि गुडाकेश मोटी यांच्यावर असेल.
टी20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचा संभाव्य संघ –
रोव्हमन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, शिमरॉन हेटमायर, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, सुनील नारायण, ऑकिल हौसेन, शेमार जोसेफ आणि गुडाकेश मोटी.
आयपीएलच्या या हंगामात सुनील नारायणनं गोलंदाजीतही आपली ताकद दाखवली आहे. त्यानं आतापर्यंत 6 सामन्यात 23.57 च्या सरासरीनं 7 विकेट घेतल्या आहेत. मात्र तो हे सीझन गाजवतोय ते त्याच्या आक्रमक फलंदाजीनं. सुनील नारायण पॉवरप्ले ओव्हर्समध्ये विरोधी गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण करतोय. मात्र आता टी-२० विश्वचषकासाठी त्याची वेस्ट इंडिज संघात निवड होते की नाही हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
टिम डेव्हिड-कायरन पोलार्डला आयपीएलनं ठोठावला दंड, कोणत्या चुकीची मिळाली एवढी मोठी शिक्षा?