---Advertisement---

बेसप्राइसपेक्षा १६ पटीने जास्त किंमत मिळालेला हा खेळाडू आनंदाने लागला नाचू, पहा व्हिडिओ…

On: शनिवार, डिसेंबर 21, 2019 12:59 PM
---Advertisement---

गुरुवारी आयपीएलच्या लिलावात वेस्ट इंडीजचा फलंदाज शिमरॉन हेटमायर मूळ (50 लाख) किंमतीपेक्षा 16 पट जास्त किंमतीने विकला गेला, दिल्ली कॅपिटल्सने तबब्ल 7.75  कोटी रुपयांना हेटमायरला विकत घेतले.

त्याला दिल्लीने संघात घेतल्यानंतर त्याने चक्क आंनदाने नाचायला सुरुवात केली. चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेटमायरला विकत घेणाऱ्या फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे.

फ्रँचायझीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आम्ही: हाय शिमरोन, दिल्ली कॅपिटल संघात तुझे स्वागत आहे. तु आमच्या चाहत्यांसाठी एक संदेश लिहू शकतो? त्यानंतर केवळ 1 मिनीटांनी…’

मागील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने हेटमायरला 5 कोटींमध्ये खरेदी केले होते. मात्र तो मागील मोसमात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तो फारसा यशस्वी ठरला नाही. मागील हंगामात, हेटमीयरने 5 सामन्यात 90 धावा केल्या.

अलीकडेच हेटमायरने भारताविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 106 चेंडूंत 139 धावांची खेळी केली. हा सामना विंडीजने 8 गडी राखून जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---