वेस्ट इंडिजचा संघ ३ वनडे मालिकेसाठी पाकिस्तानात पोहोचला आहे. दोन्ही देशांमधील ही मालिका ८ जूनपासून सुरू होणार आहे. ही मालिका आधी डिसेंबर २०२१ मध्ये खेळवली जाणार होती, परंतु त्यावेळी पाकिस्तान दौऱ्यावर टी20 मालिका खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघातील अनेक खेळाडूंना कोविड-१९ ची लागण झाली होती. यानंतर वनडे मालिका पुढे ढकलण्यात आली.
पाकिस्तान (Pakistan) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने रावळपिंडी येथे होणार होते, परंतु इस्लामाबादमधील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका मुलतानला हलवण्यात आली आहे. आता या मालिकेतील सर्व सामने मुलतानमध्ये होणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे की, वेस्ट इंडिजचा संघ ६ जून रोजी सोमवारी इस्लामाबाद विमानतळावर पोहोचला. काही वेळाने संघ चार्टर्ड विमानाने मुलतानला रवाना झाला. पीसीबीने वेस्ट इंडिजचा संघ मुल्तानला पोहोचल्याचा व्हिडिओही शेअर केला आहे.
The #MenInMaroon have arrived in Multan for the 3-match ODI series against @TheRealPCB starting on pic.twitter.com/uKFUDWEJkT
— Windies Cricket (@windiescricket) June 6, 2022
याचदरम्यान, वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने विमानात बसलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना निकोलस पूरनने “पाकिस्तान आम्ही येत आहोत,” असे लिहित पाकिस्तानच्या संघाला सावधानतेचा इशारा दिला आहे.
#Pakistan here we come pic.twitter.com/N3NFI2MsjZ
— NickyP (@nicholas_47) June 5, 2022
वेस्ट इंडिज संघ ७ जूनपासून सराव सुरू करेल तर यजमानांनी आधीच त्यांच्या सरावाला सुरुवात केली आहे. २०१९ क्रिकेट विश्वचषकात दोन्ही संघ शेवटच्या वेळी एकदिवसीय सामना खेळले. ज्यामध्ये वेस्ट इंडिजने सात विकेट्स राखून विजय मिळवला. तर पाकिस्तानचा संघ पाच वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय मालिका खेळायला गेला होता. तिथे पाकिस्तानने वेस्ट इंडिज संघाचा २-१ असा पराभव केला होता.
A warm welcome to @windiescricket in Multan 🤩#KhelAbhiBaqiHai | #PAKvWI pic.twitter.com/UTsr3f8iGV
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 6, 2022
दरम्यान, नुकताच वेस्ट इंडिज संघाने नेदरलँडचा दौरा केला होता. दोन्ही देशांदरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली गेली. वेस्ट इंडिज संघाने चमकदार कामगिरी करत यजमानांचा ३-० असा पराभव केला. या मालिकेत अकील हुसेन हा वेस्ट इंडिजचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३ सामन्यात ८ बळी घेतले, तर शमराह ब्रुक्सने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावत वेस्ट इंडिजचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अरेरे! दोन खेळाडू रिटायर्ड करूनसुद्धा पदरी शेवटी पराभवच
रियान परागने हर्षल पटेलसोबतच्या वादाची सांगितली ईनसाईड स्टोरी, बघा काय म्हणाला तो?
हे फक्त माहीच करू शकतो! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धोनीचा पुढाकार, लढवली भन्नाट शक्कल