---Advertisement---

कॅप्टन असावी तर अशी! टी20त हॅट्रिक घेत हेलीने रचला विक्रम, आयर्लंडला धूळ चारत मालिका 3-0ने खिशात

On: रविवार, जुलै 9, 2023 10:34 PM
Hayley-Matthews
---Advertisement---

वेस्ट इंडिज महिला संघाने आयर्लंड दौरा गाजवण्याचा शानदार कामगिरी केली. आयर्लंड महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघात 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका पार पडली. आधी विंडीज संघाने वनडे मालिका 2-0ने खिशात घातली. त्यानंतर शनिवारी (दि. 08 जुलै) उभय संघात टी20 मालिकेतील अखेरचा सामना पार पडला. या सामन्यात विंडीजने 8 विकेट्सने विजय मिळवत टी20 मालिकेत आयर्लंडला व्हाईट वॉश दिला. अखेरच्या सामन्यात विंडीजची कर्णधार हेली मॅथ्यूज हिने हॅट्रिक तर घेतलीच, पण त्यासोबतच फलंदाजीतूनही धमाल केली.

झाले असे की, या सामन्यात आयर्लंड महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत फक्त 116 धावाच करू शकला. हे आव्हान वेस्ट इंडिज महिला संघाने 18.1 षटकात 2 विकेट्स गमावत 117 धावा करून पार केले. यजमान संघाच्या 9 पैकी 4 विकेट्स या कर्णधार हेली मॅथ्यूज (Hayley Matthews) हिने घेतल्या होत्या. यामध्ये हॅट्रिकचाही समावेश होता.

हेलीने 4 षटके गोलंदाजी करताना 14 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट्स नावावर केल्या. तिने आयर्लंडच्या डावातील 18वे षटक टाकताना तिसऱ्या चेंडूवर रेबेक्का स्टॉकेलला शून्य धावेवर ऍफी फ्लेचरच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर तिने चौथ्या चेंडूवर आर्लेन केली हिला शून्य धावेवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर तिने अवा कॅनिंग हिलाही शून्य धावेवर त्रिफळाचीत केले आणि आपली हॅट्रिक पूर्ण केली.

विशेष म्हणजे, हेली टी20त हॅट्रिक घेणारी वेस्ट इंडिज संघाची तिसरी महिला खेळाडू ठरली. तिच्यापूर्वी टी20त हॅट्रिक घेण्याचा पराक्रम अनीसा मोहम्मद आणि स्टेफनी टेलर यांनी केला होता.

हेली बनली प्लेअर ऑफ द मॅच
आयर्लंडच्या 117 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. दुसऱ्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर जेनाबा जोसेफ वैयक्तिक 2 धावांवर तंबूत परतली. यावेळी संघाची धावसंख्या 7 होती. यानंतर हेलीने आलिया अलेने हिच्यासोबत डाव सांभाळला आणि दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी रचली. यावेळी हेलीने 34 चेंडूत 48 धावा केल्या. यामध्ये 8 चौकारांचा समावेश होता. तसेच, आलियाने 51 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. सामन्यातील अष्टपैलू कामगिरीसाठी हेलीला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. (west indies vs ireland cricketer healy matthews takes hat trick in t20 windies won series 3-0)

महत्वाच्या बातम्या-
नाद करा पण हरमनप्रीतचा कुठं! रोहितला पछाडत बनली ‘अशी’ कामगिरी करणारी पहिली भारतीय कर्णधार
वोक्स ठरला इंग्लंडचा कमबॅक हिरो! अष्टपैलू कामगिरीने राखली बॅझबॉलची इभ्रत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---