पाकिस्तान आणि वेस्टइंडीज यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मलिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज फवाद आलम याने शतकी खेळी केली. फवाद जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला होता; तेव्हा पाकिस्तानचा संघ कठीण परिस्थितीत होता. संघाने ३ विकेट केवळ २ धावांवर गमावले होते. त्यानंतर फवाद आलमने कर्णधार बाबर आजमसोबत संघाचा मोर्चा सांभाळला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारीही पार पाडली. फवादने त्याच्या या शतकानंतर खुलासा केला की, त्याच्या आईने या शतकाची भविष्यवाणी केली होती.
फवाद आलमने वेस्टइंडीजसोबतच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २१३ चेंडूत नाबाद १२४ धावा केल्या. त्याच्या कसोटी कारकिर्दीतले हे ५ वे शतक आहे. फवादच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने ३०२ धावांवर डाव घोषित केला. त्याच्या या धमाकेदार शतकानंतर त्याने सांगितले की, त्याच्या आईने शतकाची भविष्यवाणी केली होती.
तो म्हणाला, “माझ्या आईने सामन्याच्या पहिल्या दिवशी मी मैदानावर जाण्याआधी फोन केला होता. आई मला म्हणाली, जा, तू आज शतक करणार. मला माहित नाही की, हे माझ्या आईच्या आशीर्वादामुळे सिद्ध झाले की माझ्या नशीबामुळे.”
फवाद जेव्हा फलंदाजी करण्यासाठी आला होता तेव्हा पाकिस्तानचा संघा संकटात होता. संघाचे २ धावांवर ३ खेळाडू बाद झाले होते. फवादने त्याच्यानंतर कर्णधार बाबर आजमसोबत फलंदाजी करत संघाची धावसंख्या ३०० पार नेली. सामन्यात या दोघांनी १६५ धावांची भागीदारी केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आलम त्याच्या आईने केलेल्या भविष्यवाणीविषयी सांगत आहे.
त्याने पुढे बोलताना सांगितले की, “वालिद साहबनेही (वडील) मला सांगितलेलं वेस्टइंडीजमध्ये जाऊन एकदा तुझी बाॅट नक्की झळकव. माझी प्रेरणा माझे वालिद साहब आहेत. ते स्वत: एक क्रिकेटपटू होते. या गोष्टीने खूप फरक पडतो. चढ-उतार प्रत्येकाच्या कारकिर्दीत असतात, मात्र त्यांनी मला नेहमी प्रेरित केले.”
महत्त्वाच्या बातम्या-
कधी, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना? जाणून घ्या एका क्लिकवर
सूर्या-पृथ्वीची ‘३६० डिग्री’ फटकेबाजी पाहण्याची सर्वांनाच आतुरता, पण नेमकं कोणाच्या जागी खेळवणार?
तिसऱ्या कसोटीत ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ पुजाराचा कटणार पत्ता? उपकर्णधार रहाणेने दिले ‘असे’ संकेत