---Advertisement---

मेकॉय पुढे टीम इंडियाची वाताहात! दुसरा टी२० जिंकत यजमानांनी मालिका आणली बरोबरीत

On: मंगळवार, ऑगस्ट 2, 2022 6:34 AM
shreyas flop
---Advertisement---

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेत दुसरा टी२० सामना सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क मैदानावर खेळला गेला. अखेरच्या षटकापर्यंत पोहचलेल्या या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने ५ गडी राखून विजय मिळवत, मालिका १-१ अशा बरोबरीत आणली. भारताचे सहा बळी टिपणारा वेगवान गोलंदाज ओबेद मेकॉय सामन्याचा मानकरी ठरला.

https://twitter.com/ICC/status/1554243031338983424?t=Uo3xzkoAYRQ2Ip_W09nNXg&s=19

 

नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिराने सुरू झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय मेकॉयने पहिल्या चेंडूवर सार्थ ठरवला आणि भारतीय कर्णधार रोहित शर्माला गोल्डन डकवर तंबूत पाठवले. श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव हेदेखील फार काळ तग धरू शकले नाहीत. भारताची अवस्था एकवेळ ३ बाद ४० अशी झालेली. रिषभ पंत व हार्दिक पंड्या यांनी चौथ्या गड्यासाठी २१ धावांची वेगवान भागीदारी केली. त्यानंतर हार्दिक व जडेजा या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंनी अनुक्रमे ३१ व‌ २७ धावांचे योगदान दिले. तळातील फलंदाज फारसे योगदान देऊ शकले नाहीत. परिणामी, भारतीय संघ १९.४ षटकांत १३८ धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडीजसाठी वेगवान गोलंदाज ओबेद मेकॉयने केवळ १७ धावा देत ६ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

प्रत्युत्तरात, यजमान वेस्ट इंडिज संघाला ब्रेंडन किंगने तुफानी सुरुवात दिली. त्याच्या फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजने सहा षटकात ४६ धावा उभारल्या. दुसऱ्या बाजूने मात्र, फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. किंग ५२ चेंडूवर ६८ धावांची खेळी करून बाद झाला तेव्हा संघाला विजयासाठी २७ चेंडूवर ३२ धावांची गरज होती. अखेरच्या दोन षटकात १६ धावांची गरज असताना अर्शदीपने केवळ सहा धावा देत सामन्यात रंगत आणली. मात्र, शेवटच्या षटकातील पहिला चेंडू नो बॉल व त्यानंतर लागोपाठ षटकार व चौकार खेचत डेवॉन थॉमसने सामना वेस्ट इंडीजच्या पारड्यात टाकला.

आता मालिकेतील पुढील सामना याच मैदानावर आज रात्री (२ ऑगस्ट) खेळला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार सामना रात्री ८ वाजता सुरू होईल. दोन्ही संघ हा सामना जिंकून आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंड कर्णधाराच्या मनात निवृत्तीचा विचार? दिले स्पष्टीकरण

पहिल्या टी-२० विजयानंतर टीम इंडियाचा विशेष सन्मान, रोहितला मिळाले स्पेशल गिफ्ट

CWG 2022 | कॉमनवेल्थ गेम्समध्ये सायकलस्वारांनी सोडला ट्रॅक, पाहा भीषण अपघाताचा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---