टी20 विश्वचषक 2024 च्या साखळी फेरीच्या अंतिम सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने अफगाणिस्तान विरुद्ध शानदार विजय मिळवला आहे. कॅरेबियन खेळाडूंनी आपल्या घरच्या मैदानात जोरदार शक्ती प्रदर्शन करत अफगाणिस्तानविरुद्ध हा सामना 104 धावांच्या मोठ्या फरकाने आपल्या नावे केला आहे. या विजयामुळे सुपर-8 मधील सामन्यांपूर्वी वेस्ट इंडिज संघाचा अत्मविश्वास आणखी वाढला आहे. विश्वचषकाच्या ‘क’ गटातून वेस्ट इंडिज व अफगाणिस्तान दोन्ही संघ सुपर-8 साठी आधीच पात्र ठरले आहेत.
यंदाच्या टी20 विश्वचषकाच्या 40 व्या सामन्यात वेस्ट इंडिज व अफगाणिस्तान संघ आमने सामने होते. हा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी स्टेडियम येथे झाला. टाॅस जिंकून अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने प्रथम गोलंदीजा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करण्यास आलेल्या वेस्ट इंडिजने 20 षटकांत 218 धावांचे तगडे आव्हान अफगाणिस्तान समेर ठेवले. यजमान संघाची सुरुवात थोडी निराशाजनक झाली. सलामीवीर फलंदाज ब्रँडन किंग 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला निकोलस पूरन आणि जॉन्सन चार्ल्स दोघांनी जोरदार फटकेबाजी करत 80 धावांची निर्णायक भागीदारी केली. जॉन्सन चार्ल्सने 27 चेंडूत 43 धावा केल्या तर निकोलस पूरनने 53 चेंडूत 98 धावा केल्या मात्र 2 धावांनी त्याचे शतक हुकले. 19.4 षटकात तो धावबाद झाला. तर अफगाणिस्तानकडून गोलंदीजत गुलबदिन नाईबने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
तर दुसऱ्या डावात 218 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाची सुरुवात खूपच खराब झाली. चांगल्या फाॅर्म मध्ये असलेल्या रहमानउल्ला गुरबाज शून्यवरबाद झाला.तर इब्राहिम झद्रानने सर्वाधिक 38 धावा केल्या, ठराविक अंतरावर वेस्ट इंडिज संघाने अफगाणिस्तानला धक्के देत राहिला त्यामुळे अफगाणिस्तान 114 धावांत गडगडला. वेस्ट इंडिज कडून गोलंदजीत ओबेद मॅकॉयने सर्वाधिक 3 षटकात 14 धावा देत 3 बळी घेतले. निकोलस पूरनच्या आक्रमक खेळीसाठी त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
महत्तवाच्या बातम्या-
टीम इंडियाला मिळणार पुणेकर विकेटकीपर? MPL मध्ये ऋतुराज गायकवाडची विकेटमागे धमाल; पाहा VIDEO
लॉकी फर्ग्युसन टी20 क्रिकेटमध्ये 4 मेडन ओव्हर्स टाकणारा दुसरा गोलंदाज! जाणून घ्या पहिला कोण होता?
टी20 विश्वचषकात निकोलस पूरनचा कहर! एकाच षटकात ठोकल्या 36 धावा, अनेक विक्रम मोडले