पुणे, दि. १७ डिसेंबर २०२३ – डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित व स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो कटककर करंडक’ स्पर्धेत अंतिम फेरीत वेस्टर्न रेल्वे संघाने इंडियन नेव्ही संघाचा १२-९ असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखान्याच्या टिळक तलावावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीतचुरशीच्या लढतीत पहिल्या क्वार्टरमध्ये इंडियन नेव्ही संघाने सुरेख खेळ करत वेस्टर्न रेल्वे विरुद्ध ३-२ अशी आघाडी मिळवली. मात्र त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये वेस्टर्न रेल्वेच्या आश्विनीकुमार कुंडेने सुरेख खेळ करत संघाला ६-५ अशी आघाडी प्राप्त करून दिली. त्यानंतर वेस्टर्न रेल्वेच्या खेळाडूंनी आपले आक्रमण कायम राखत तिसऱ्या क्वार्टरमध्ये इंडियन नेव्ही विरुद्ध १०-६ अशी आघाडी कायम राखली. अखेरच्या क्वार्टरमध्ये वेस्टर्न रेल्वेच्या सारंग वैद्य, भूषण पाटील यांनी जोरदार खेळ केला व इंडियन नेव्ही संघाविरुद्ध १२-९ अशा फरकाने विजय मिळवला. वेस्टर्न रेल्वेकडून अश्विनीकुमार कुंडे ४, श्रेयस वैद्य १, अर्जुन कवळे १, सारंग वैद्य ३, करण शुक्ला १, भूषण पाटील २ यांनी गोल केले. तर इंडियन नेव्हीकडून अनंतू जी एस २, प्रणव म्हात्रे २, गोकुळ १, भागेश कुटे १, मिधुन १, वैभव कुटे २ याना गोल करण्यात यश आले.
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या या लढतीत आशिष सरदार ३, एस के आर्यन रहमान १, सोमेन मोंडल १, सौविक ढाली २, एस के अल्विरीझा २, फिरोज सरदार २, बिस्वजीत दत्ता १ याने केलेल्या जोरावर कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए) संघाने ईस्टर्न रेल्वेविरुद्ध १२-९ असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला. पाचव्या व सहाव्या क्रमांकासाठी लढतीत डेक्कन जिमखाना संघाने इंडियन एअरफोर्सचा २१-१४ असा पराभव करून पाचवा क्रमांक पटकावला. विजयी संघाकडून ऋतुराज बिडकर ४, मनीष खोमणे ३, गौरव महाजनी ५, पीयूष सूर्यवंशी ९ यांनी गोल करून संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेतील विजेत्या वेस्टर्न रेल्वे संघाला कटककर करंडक व ५००००रुपये, तर उपविजेत्या इंडियन नेव्ही संघाला करंडक व ३००००/- रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय वॉटर पोलो खेळाडू संजय करंदीकर, शैलेश ताम्हणकर, पुणे जिल्हा ऍक्वेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित सोहोनी, सचिव जय आपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, वित्तीय विभागाचे सचिव मिहीर केळकर, स्पर्धा संयोजन सचिव अमित गोळवळकर, नीता तळवळीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: अंतिम फेरी:
वेस्टर्न रेल्वे:१२ (आश्विनीकुमार कुंडे ४, श्रेयस वैद्य १, अर्जुन कवळे १, सारंग वैद्य ३, करण शुक्ला १, भूषण पाटील २)वि.वि.इंडियन नेव्ही: ९(अनंतू जी एस २, प्रणव म्हात्रे २, गोकुळ १, भागेश कुटे १, मिधुन एजे१, वैभव कुटे २); सामनावीर – आश्विनीकुमार कुंडे;
तिसरे आणि चौथे स्थान:
कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए): १२ (आशिष सरदार ३, एस के आर्यन रहमान १, सोमेन मोंडल १, सौविक ढाली २, एस के अल्विरीझा २, फिरोज सरदार २, बिस्वजीत दत्ता १) वि.वि.ईस्टर्न रेल्वे: ९(चंदन दास १, अरित्र दास १, सोमनाथ १, सतदीप भटाचार्जी १, किशोर २, कुमारजीत दत्ता ३);सामनावीर- आशिष सरदार;
पाचवे व सहावे स्थान:
डेक्कन जिमखाना: २१ (ऋतुराज बिडकर ४, मनीष खोमणे ३, गौरव महाजनी ५, पीयूष सूर्यवंशी ९) वि.वि.इंडियन एअरफोर्स: १४(नितीश २, राज पाटील २, लालकृष्ण ३, सिबिन वर्गीस ३, जिजीन नायर १, वेदांत कुटे १, श्रीजित १, प्रवीण जी के १); सामनावीर -पीयूष सूर्यवंशी
सातवे आणि आठवे स्थान:
अमरावती: १२ (पार्थ अंबुलकर २, जयेश वानखेडे ७, उत्कर्ष थोरात २, आलोक देशमुख १, मंथन शिवणीकर ५, आर्यन हिंगमिरे १) वि.वि.मिदनापूर स्विमिंग क्लब: २ (अरित्र दास १, सायन बोस १); सामनावीर- मंथन शवनीकर.
इतर पारितोषिके:
बेस्ट गोलरक्षक: मंदार भोईर(वेस्टर्न रेल्वे);
बेस्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: सौविक ढाली(सीएसए)
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी- विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग 2023 स्पर्धेत लायन्स संघाला विजेतेपद
IPL 2023 । सचिनने मुंबई इंडियन्सची साथ सोडली? समोर आली महत्वाची माहिती