चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. शनिवारी (१५ फेब्रुवारी) सामन्याचा तिसरा दिवस सुरू आहे. भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर या सामन्यात विजयासाठी ४८२ धावांचे लक्ष ठेवले आहे.
भारताच्या दुसऱ्या डावात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दमदार शतक ठोकले. या शतकाचा आनंद नॉन स्ट्राईकला असलेल्या मोहम्मद सिराजने सर्वात आधी साजरा केला. मात्र, बरोबर सहा वर्षापूर्वी देखील एका खेळाडूने शतक केल्यानंतर दुस-या खेळाडूने आनंद साजरा करण्याचा क्षण तमाम क्रिकेटप्रेमींनी पाहिला होता. आता, त्या घटनेचे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे.
अश्विनच्या शतकानंतर सिराजचे सेलिब्रेशन
रविचंद्रन अश्विनने मोईन अलीच्या चेंडूवर चौकार मारत आपले शतक पूर्ण केले. यावेळी नॉन स्ट्राइकवर असलेल्या मोहम्मद सिराजला इतका आनंद झाला की, चेंडू चौकारापर्यंत पोहोचण्याआधीच त्याने सेलिब्रेशन सुरू केले होते. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच, सोशल मीडियावरून त्याच्या निस्वार्थ कृतीचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत.
A moment to cherish forever! @ashwinravi99 gets his Test💯 in Chennai and Md. Siraj erupts in joy. The dressing room stands up to applaud.🙌🏾 #TeamIndia #INDvENG @paytm pic.twitter.com/ykrBhsiTbl
— BCCI (@BCCI) February 15, 2021
जुळून आला योगायोग
सिराजने ज्याप्रकारे अश्विनच्या शतकानंतर सेलिब्रेशन केले, अगदी तशीच घटना सहा वर्षांपूर्वी घडली होती. साल २०१५ च्या वनडे विश्वचषकात १५ फेब्रुवारी याच दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते. विराटने शतक पूर्ण करण्यासाठी फटका खेळल्यानंतर नॉन स्ट्राइकला असलेल्या सुरेश रैनाने हात उंचावून जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. त्याच्या या कृतीचे आजही अनेक जण भरभरून कौतुक करत असतात.
आता, बरोबर सहा वर्षाने सिराजने अशीच कृती केली. या दोघांच्या कृतीचे एकत्र छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
That too on the same day 6 years later https://t.co/GWVczr02u2
— Bharath (@carromball_) February 15, 2021
खिलाडूवृत्तीसाठी प्रसिद्ध आहेत रैना आणि सिराज
सुरेश रैना आपल्या संपूर्ण कारकीर्दीत अशाप्रकारे खिलाडूवृत्तीस पूरक कृती करण्यासाठी ओळखला जात होता. तसेच, सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरून ग्रीन याला चेंडू लागल्यानंतर फलंदाजी सोडून तात्काळ त्याच्याकडे धाव घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
…अन् बेन स्टोक्स रागाने झाला लालबुंद, हेल्मेट जमिनीवर आदळलं आणि केलं असं काही
‘चाॅंद तारे फुल शबनम, तुम से अच्छा कौन हैं’; अश्निनचं धमाकेदार शतक आणि सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस