भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या ब्रिस्बेन येथील चौथ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट संघर्ष बघायला मिळत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने सुरुवातीच्या 2 विकेट झटपट गमावल्यानंतर स्मिथ व लॅब्यूशेनच्या उत्तम फलंदाजीने सामन्यात पुनरागमन केले होते. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरणार, असे वाटत असतानाच आपले कसोटी पदार्पण करत असलेल्या वॉशिंग्टन सुंदरने स्मिथला बाद केले.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 35 वे शतक टाकण्यासाठी आलेल्या सुंदरने षटकातील पहिल्याच चेंडूवर स्मिथला शॉर्ट मिड-विकेटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या रोहितकडे झेल देण्यास भाग पाडत बाद केले. लेग स्टम्पवर आलेल्या चेंडूवर अलगद प्रहार करत एक धाव घेण्याच्या नादात स्मिथ बाद झाला. स्मिथने 77 चेंडूंचा सामना करत 36 धावांची खेळी केली.
त्यामुळे स्मिथ हा सुंदरची पहिली कसोटी विकेट ठरला आहे.
What a moment for Washington Sundar! His first Test wicket is the superstar Steve Smith! #OhWhatAFeeling@Toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/ZWNJsn0QNN
— cricket.com.au (@cricketcomau) January 15, 2021
स्मिथ आयपीएलमधील पहिला कर्णधार
विशेष म्हणजे 2017 ला जेव्हा सुंदरने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा तो स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला होता. म्हणजेच स्मिथ सुंदरचा आयपीएलमधील पहिला कर्णधार होता.
पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या २७४ धावा –
ब्रिस्बेन कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकूरने सुरुवातीचे झटके दिले. सिराजने वॉर्नरला तर शार्दुलने मार्कस हॅरिसला बाद केले. मात्र यानंतर स्मिथ व लॅब्यूशेनने उत्तम भागीदारी केली. स्मिथ बाद झाल्यानंतर भारतीय संघ सामन्यात जोरदार पुनरागमन करेल अशी शक्यता होती, मात्र लॅब्यूशेनचे 2 सोपे झेल सोडल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला पुन्हा सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. या जीवदानाचा फायदा घेत त्याने शतकी खेळी केली. पण अखेर त्याला 108 धावांवर असताना टी नटराजनने बाद केले. तर मॅथ्यू वेडने 45 धावांची खेळी केली.
वेड आणि लॅब्यूशेन बाद झाल्यावर भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करेल असे वाटले होते, पण कर्णधार टीम पेनने युवा कॅमेरॉन ग्रीनला साथीला घेत संघाचा डाव सांभाळला आणि पहिल्या दिवसाखेर आणखी विकेट जाऊ दिली नाही. दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 5 बाद 274 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून ब्रिस्बेन कसोटीतून पदार्पण केलेल्या त्या भारतीय खेळाडूचे नाव आहे ‘वॉशिंग्टन’!
एकेवेळी कापायचा क्रिकेट मैदानावरील गवत, आज नावावर आहेत १०० कसोटी सामने