ब्रिस्बेन। भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या सामन्यातून भारताकडून टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. त्यातील टी नटराजनने पदार्पण केल्याने त्याच्या नावावर काही खास विक्रम नोंदवले गेले आहेत.
नटराजनने कसोटी पदार्पण करण्याआधी याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये देखील पदार्पण केले आहे. त्यामुळे तो एकाच दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तीन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
एवढेच नव्हे तर तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण करण्यासाठी नटराजनला केवळ ४४ दिवसांचा कालावधी लागला आहे. याआधी कोणत्याच भारतीय क्रिकेटपटूने एवढ्या कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तीन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण केले नव्हते.
याबरोबरच नटराजनने कसोटीमध्ये पदार्पण करण्याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सगल १० डावात एकही धाव केलेली नाही. फलंदाजी मिळालेल्या गेल्या १० डावात त्याने शुन्य धावा केल्या आहेत. यातील ५ डावात तो शुन्यावर नाबाद राहिला आहे. त्यामुळे तो पहिलाच असा भारतीय खेळाडू आहे, ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलग १० डावात एकही धाव केली नाही आणि तरीही कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे.
मॅथ्यू वेड पहिली कसोटी विकेट –
नटराजनने या सामन्यात ऑस्ट्रेलियचा फलंदाज मॅथ्यू वेडने बाद करत पहिली कसोटी विकेट घेतली. त्याच्या गोलंदाजीवर वेडचा झेल शार्दुल ठाकूरने घेतला. त्यामुळे वेडला ८७ चेंडूत ४५ धावा करुन विकेट गमवावी लागली. त्यापाठोपाठ लगेचच ६६ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर टी नटराजनने शतकवीर मार्नस लॅब्यूशेनलाही झेलबाद केले. त्यामुळे नटराजनसाठी त्याचे कसोटी पदार्पण लक्षात राहिल, असेच राहिले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरची कमाल! पहिल्याच चेंडूवर विकेट घेत केला ‘हा’ मोठा विक्रम
रोहितने घेतला स्मिथचा ‘सुंदर’ झेल आणि वॉशिंग्टनला मिळाली पहिली कसोटी विकेट, पाहा व्हिडिओ
…म्हणून ब्रिस्बेन कसोटीतून पदार्पण केलेल्या त्या भारतीय खेळाडूचे नाव आहे ‘वॉशिंग्टन’!