---Advertisement---

मार्टिन गप्टिलने घेतला स्टिव्ह स्मिथचा एका हाताने जबरदस्त झेल, पहा व्हिडिओ

On: शनिवार, जून 29, 2019 8:45 PM
---Advertisement---

लंडन। 2019 विश्वचषकातील 37 वा सामना आज(29 जून) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स मैदानावर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिलने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथचा एका हाताने शानदार झेल घेतला आहे.

या सामन्यातील 12 व्या षटकात न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्यूसन गोलंदाजी करत होता. त्याने या टाकलेल्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर स्मिथने पुल शॉट खेळला. पण लेग-गलीला उभ्या असणाऱ्या गप्टिलने हवेत उडी मारुन डाव्या हाताने हा चेंडू झेलला. त्यामुळे स्मिथला विकेट गमवावी लागली.

विशेष म्हणजे हा झेल घेण्याआधी गप्टिलने या सामन्यात दोन झेल सोडले होते. पण तरीही न्यूझीलंडने सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर दबाव ठेवला होता.

न्यूझीलंडने या सामन्यात गोलंदाजीची चांगली सुरुवात करताना ऑस्ट्रेलियाला 21.3 षटकात 5 विकेट घेत मोठा धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाने ऍरॉन फिंच(8), डेव्हिड वॉर्नर(16), स्टिव्ह स्मिथ(5), मार्कस स्टॉयनिस(21) आणि ग्लेन मॅक्सवेल(1) यांच्या विकेट स्वस्तात गमावल्या आहेत.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

https://twitter.com/cricketpunt/status/1144961162452381696

https://twitter.com/Ubaid__420/status/1144966681267200000

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेट नाही तर आता या क्षेत्रातून मनोरंजन करणार युवराज सिंग

८ धावांवर बाद होऊनही फिंचचा झाला सचिन-हेडन सारख्या दिग्गजांच्या यादीत समावेश

भारताविरुद्धच्या सामन्यानंतर विंडीजच्या या खेळाडूला आयसीसीने सुनावली शिक्षा, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment