क्रिकेटमध्ये दुखापतग्रस्त असतानाही सामना वाचवण्यासाठी मैदानात खेळायला येणाऱ्या अनेक खेळाडूंची उदाहरणे आहेत. यासाठी खेळाडू अनेक युक्त्याही वापरतात.
पण इंग्लडमध्ये चालू असलेल्या कौंटी चॅम्पियनशिपस्पर्धेत लँकेशायर संघाचा कर्णधार लियाम लिविंगस्टोन फ्रॅक्चर झालेल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचे संरक्षण करण्यासाठी चक्क शीनगार्ड घालून मैदानात उतरला होता.
हा प्रकार यॉर्कशायर विरुद्ध लँकेशायर संघात पार पडलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 24 जुलैला घडला.
How about this effort from Liam Livingstone??? Busted hand, still headed out to bat!
What are the most courageous moments in sports?
(📸: @chronicleladams) pic.twitter.com/djMjrw9nRC
— The Sporting Capital (@SportCapitalSEN) July 24, 2018
या सामन्यात लँकेशायर विजयासाठी दुसऱ्या डावात 323 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होते. पण यॉर्कशायरकडून जो रुट आणि स्टीव्हन पॅटरसन यांनी उत्तम गोलंदाजी करत लँकेशायरचे 9 फलंदाज 204 धावात माघारी धाडले होते.
त्यामुळे सामना वाचवण्याच्या दृष्टीने दुखापतग्रस्त असणारा लिविंगस्टोन डाव्या हाताला शीनगार्ड लावून फलंदाजीसाठी आला. यावेळी जेम्स अँडरसन खेळपट्टीवर फलंदाजी करत होता.
मात्र लिविंगस्टोनला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही कारण रुटने अँडरसनला बाद करत लँकेशायरचा दुसरा डाव 204 धावांवरच संपुष्टात आणला आणि यॉर्कशायरला 118 धावांनी विजय मिळवून दिला.
Look at the state of the cast Liam Livingstone is wearing for his broken thumb in the Roses pic.twitter.com/oU88LW49JK
— Will Macpherson (@willis_macp) July 24, 2018
लिविंगस्टोनला ही दुखापत याच सामन्याच्या पहिल्या दिवशी 22 जुलैला क्षेत्ररक्षणा दरम्यान झाली होती. त्यामुळे तो लँकेशायरच्या पहिल्या डावात खेळला नव्हता. पण त्याने दुसऱ्या डावात जर फलंदाजीची गरज पडू शकते असा विचार करुन एका हाताने फलंदाजी करण्याचा सराव केला होता.
Liam Livingstone practising one-handed for later, should he be required.
Bats better with one hand than most of us do with two!@liaml4893 @lancscricket pic.twitter.com/gD3nE0rG2i
— James Buttler | Cricket Badger Podcast 🏏🦡🇺🇦 (@cricket_badger) July 24, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया अ संघ जाहिर, वरीष्ठ संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना संधी
–माजी कर्णधार सौरव गांगुलीची आर अश्विनसाठी बॅटिंग
–2003 च्या विश्वचषकानंतर अॅडम गिलक्रिस्टचा तब्बल 15 वर्षांनी मोठा खुलासा