टीम इंडीयाच्या मुख्य प्रशिकक्षक पदाावर कोणाची वर्णी लागणार? याकडे संपूर्ण जगाच लक्ष लागून राहिलं आहे. आगामी टी-20 विश्वचषकानंतर सध्याचे हेड कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. अश्यावेळी बीसीसीआयने इच्छुक उमेदवारांकडून 27 मे प्रर्यंत अर्ज देखील मागवल्या होत्या. पण मग मुख्य प्रशिकक्षकपदासाठी कोणही अर्ज करु शकेल का? तर या बातमीद्वारे जाणून घेऊया, बीसीसीआयने प्रशिकक्षकपदासाठी कोण कोणत्या नियम व अटी ठेवल्या आहेत.
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 3000 हून आधिक अर्ज आले आहेत. अशी माहिती बीसीसीआयच्या सुत्रांकडून समोर आली होती. ज्यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा, सचिन तेंडूलकर यांच्या नावाचा समावेश करुन बनावट अर्ज बीसीसीआयच्या अधिकृत साईटवर जमा झाले आहेत. बीसीसीआयनं गुगल फाॅर्म द्वारे अर्ज करण्यास सांगितले होते. पण बीसीसीआयच्या नियम व आटीस पात्र उमेदवारस यासाठी निवडण्यात येणार आहे.
जाणून घ्या मुख्य प्रशिकक्षकपदासाठी बीसीसीआयच्या नियम व अटी
कमीत कमी 30 कसोटी सामने किंवा 50 एकदीवसीय सामन्यांचा अनुभव
टीम इंडीयाच्या मुख्य प्रशिकक्षक होण्यासाठी पात्र खेळाडूस (उमेदवार) 30 कसोटी सामने किंवा 50 एकदीवसीय सामने खेळल्याचे अनुभव असणे गरजेचे आहे. जर उमेदवाराकडे सामन्यांचा अनुभव नसल्यास तर त्याला पूर्ण खेळाडू असलेल्या कसोटी खेळणाऱ्या संघाचा किमान 2 वर्षांचा मार्गदर्शनचा (कोचिंग) अनुभव असला पाहिजे. तर तो टीम इंडीयाच्या मुख्य प्रशिकक्षकपदासाठी अर्ज करु शकतो.
वयोवर्ष 60 च्या आतील उमेदवार अर्जासाठी पात्र
मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वात महत्वाची अट ही वयोवर्ष आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 60 वर्षाच्या आत असायला हवं आहे. जर 60 वयोवर्ष पुढील उमेदवार पदासाठी पात्र ठरणार नाहीत. याशिवाय उमेदवारकडे बीसीसीआयचे लेव्हल 3 प्रमाणपत्र समतुल्य असणे आवश्यक आहे.
महत्तवाच्या बातम्या-
एमपीएलच्या दुसऱ्या हंगामासाठी रत्नागिरी जेट्स सज्ज, नव्या कोऱ्या जर्सीचे केले अनावरण । MPL 2024
ऑरेंज कॅप मिळताच विराट कोहली झाला भावूक म्हणाला..”ऑरेंज कॅप मिळणे..”‘
दोन महिने दातही घासले नाहीत’, जिवनातील सर्वात वाईट वेळ आठवून ऋषभ पंत झाला भावूक





