यंदाच्या टी20 विश्वचषकाची सुरुवात 2 जूनपासून होणार आहे. 2022 चा टी20 विश्वचषक इंग्लड संघानं जिंकला होता. त्यावेळी इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर होता. यंदाच्या टी20 विश्वचषकातही इंग्लंड संघाची धुरा जोस बटलरच्या हाती आहे. 2022 च्या टी20 विश्वचषकात इंग्लंडचा संघ सुरुवातीच्या सामन्यांमध्ये काही खास कामगिरी करु शकला नव्हता. परंतु साखळीफेरीच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेला 4 विकेट्सनं मात दिली आणि टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली.
परंतु यंदाच्या टी20 विश्वचषकातही इंग्लंडचा संघ विजेता बनेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सलग दुसरा टी20 विश्वचषकही इंग्लंड संघ विजेता बनेल असे म्हंटलजात आहे. इंग्लंडचा यंदाचा फलंदाजी क्रम खूप आक्रमक दिसून येत आहे. इंग्लडच्या टाॅप आर्डर फलंदाजीमध्ये जोस बटलर, फिल साल्टसारख्या आक्रमक खेळाडूंचा समावेश आहे, तर विल जॅकसुद्धा या संघाचा भाग आहे. हे तीनही खेळाडूंनी आयपीएल 2024 च्या या हंगामात आक्रमक फलंदाजी केली.
टी20 सामन्यात अंतिम षटकात फटकेबाजी करण्याची गरज असते. तर इंग्लडच्या मधल्या फळीत जाॅनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, लियम लिविंगस्टन यांसारख्या आक्रमक खेळाडूंचा समावेश आहे. टी20 विश्वचषकात इंग्लंडसाठी सॅम करन अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावताना दिसणार आहे. आयपीएल 2024 च्या हंगामात सॅम करननं चेंडू आणि फलंदाजीसह चांगलाच प्रभाव पाडला. तर इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनं संघात पुनरागमन केलं आहे.
जोफ्रा आर्चरच्या पुनरागमनानं इंग्लडच्या गोलंदाजीत उर्जा निर्माण झाली आहे. इंग्लंडच्या गोलंदाजीत ख्रिस जॉर्डन, मार्क वुड यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. तर फिरकीपटूची जबाबदारी आदिल राशिद या अनुभवी खेळाडूकडे आहे. त्यामुळे इंग्लडचा संघ यंदाच्या टी20 विश्वचषकात मजबूत दिसत आहे.
इग्लंडचा टी20 विश्वचषकासाठी संघ- जोस बटलर (कर्णधार), फिल साल्ट, विल जॅक्स, जॉनी बेयरस्टो, बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियम लिविंगस्टन, मोईन अली (उपकर्णधार), सॅम करन, ख्रिस जॉर्डन, टॉम हार्टले, आदिल राशीद, जोफ्रा आर्चर, मार्क वुड, रीस टोप्ले
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यावरच पावसाच सावट! टेक्सासमध्ये दररोज पडतोय पाऊस
मेगा लिलावात इतकेच खेळाडू कायम ठेवता येतील, संघांना बसला धक्का!
टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघ ‘या’ 11 खेळाडूंसोबत उतरु शकतो