इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या मेगा लिलावाची उत्सुकता अवघ्या काही तासांमध्ये संपणार आहे. आंतरराष्ट्रीय दिग्गज तसेच युवा खेळाडू मिळून तब्बल ६०० नावांवर बोली लावली जाईल. आयपीएलमधील १० फ्रॅंचाईजी या मेगा लिलावात आपला संघ उभा करतील. १२ व १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे पार पडणार आहे. मात्र, या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी एक्सेलरेशन बिडींग होईल. हे एक्सेलरेशन बिडींग नक्की काय आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
असा रंगणार लिलाव
आयपीएल २०१८ नंतर प्रथमच खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडेल. यामध्ये ६०० खेळाडूंवर बोली लावली जाईल. यापैकी जास्तीत जास्त ६२ विदेशी खेळाडूंवर बोली लागण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील १० संघांत या खेळाडूंना आपल्याकडे घेण्यासाठी स्पर्धा असेल.
एक्सेलरेशन बिडींग म्हणजे काय?
लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व प्रमुख खेळाडूंची बोली लागली जाईल. पहिल्या दिवशी एकूण १५९ खेळाडूंवर बोली लागणार आहे. यापैकी जे खेळाडू विकले जाणार नाहीत त्यांच्यावर दुसऱ्या दिवशीही बोली लागेल. दुसऱ्या दिवशी जे शिल्लक खेळाडू आहेत त्या सर्वांवर मात्र बोली लागणार नाही. उपस्थित फ्रॅंचाईजी आपल्याला हव्या असलेल्या खेळाडूंची नावे ऑक्शनर ह्युज एडमिड्स यांना देतील. केवळ त्याच नावांवर यावेळी बोली लागेल.
बीसीसीआय पदाधिकारी राहणार उपस्थित
या मेगा लिलावासाठी संघमालक व सपोर्ट स्टाफसह बीसीसीआयचे पदाधिकारी देखील उपस्थित राहतील. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली प्रकृती अस्वास्थ्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र, बीसीसीआय सचिव जय शहा, उपाध्यक्ष राजीव शुक्ला व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल या कार्यक्रमात बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा लिलाव बेंगलोरमध्ये आयटीसी हॉटेल येथे पार पडेल.
महत्वाच्या बातम्या-