Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘सुपरमॅक्स क्रिकेट’मध्ये होते जगावेगळे नियम, वाईडला मिळायच्या 2 धावा; पण एकाच मॅचनंतर झालं बंद, कारण…

'सुपरमॅक्स क्रिकेट'मध्ये होते जगावेगळे नियम, वाईडला मिळायच्या 2 धावा; पण एकाच मॅचनंतर झालं बंद, कारण...

March 5, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Supermax-Cricket

अलीकडेच वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाने सिक्स्टी हा क्रिकेटचा नवा फॉरमॅट आणण्याची घोषणा केली होती. 10 ओव्हर म्हणण्यापेक्षा 50 बॉल खेळायला मिळणार अशी ही संकल्पना यात इतरही काही नियम आहेत. क्रिकेटचा हा सर्वात नवा प्रकार. परंपरागत क्रिकेट म्हणजे टेस्ट क्रिकेट. लाल बॉलने पाच दिवस चालणारे हे क्रिकेट. पुढे सत्तरच्या दशकात वनडे क्रिकेट आले. ते लोकांनी डोक्यावर घेतले. 21वे शतक उजाडताच टी20 ने मार्केट आपला केल. आजही टी20 क्रिकेटच मनोरंजनाचा बाप आहे. त्यानंतर टी10 ला आणि हंड्रेडला सुरुवात झाली. हे दोन्ही फॉर्मेट इंटरनॅशनल लेवलला खेळले जात नसले तरी, त्यांच्या लीग आयोजित होतायेत. अशातच आता कॅरेबियन बेटांवर होणारी सिक्सटी क्रिकेटला आणखी एक तडका देईल. या सर्वात एक असा फॉरमॅट होऊन गेला ज्याची केवळ एक मॅच इंटरनॅशनल लेव्हलला खेळली गेली. हा फॉरमॅट अनेकांच्या विस्मृतीतही गेला असेल. आजच्या लेखामध्ये आपण त्याच फॉरमॅटविषयी जाणून घेऊ.

इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये केवळ एका मॅचसाठी वापरलेला हा फॉरमॅट होता सुपरमॅक्स क्रिकेट. टी20, वनडे आणि टेस्ट क्रिकेट अशा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटची एकत्रित भेळ म्हणजे हा सुपरमॅक्स फॉरमॅट. न्यूझीलंडचे ऑलटाइम ग्रेट कॅप्टन मार्टिन क्रो यांनी क्रिकेटला आणखी एंटरटेनिंग बनवण्याच्या इराद्याने 1996 मध्ये या फॉर्मेटची संकल्पना मांडली. न्यूझीलंडमध्येच प्रायोगिक तत्त्वावर या सुपरमॅक्स क्रिकेटच्या काही फर्स्ट क्लास मॅचेस खेळल्या गेल्या. त्यानंतर 2002 मध्ये न्यूझीलंड आणि भारत यांच्यात पहिली आणि एकमेव सुपरमॅक्स इंटरनॅशनल मॅच खेळली गेली‌‌.

कसा होता हा सुपरमॅक्स फॉरमॅट? अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर टी20 प्रमाणे दोन्ही टीम 20-20 ओवर्स खेळणार. त्यात ट्विस्ट असा की टेस्टप्रमाणे दोन्ही टीम्सना 10-10 ओव्हर्सच्या दोन इनिंग मिळणार आणि वनडेप्रमाणे मॅच एका दिवसात संपणार. इतकं साधं आणि सोपं गणित. आता या फॉरमॅटमधील बाकीचे नियम काय होते हे झटपट जाणून घेऊ. आता ज्या नोबॉल आणि फ्री हिटमुळे बॅटर्सची चांदी होते त्याचं मूळ याच सुपरमॅक्स क्रिकेटचं. टीममध्ये अकराच प्लेयर खेळणार मात्र एक बारावा स्पेशालिस्ट फिल्डर गरजेनुसार केव्हाही फील्डिंगला आणता येत होता.

जगावेगळे नियम
क्रिकेटमध्ये ज्या एलबीडब्ल्यू नियमामुळे सर्वाधिक वाद वाढतात व अंपायर्सना शर्मसार व्हावं लागतं, तो एलबीडब्ल्यू नियमच या सुपरमॅक्स क्रिकेटमधून हटवला गेलेला. त्याला पर्याय म्हणून तीनऐवजी चार स्टंप्स लावले जायचे. वाईड बॉलला एक नव्हेतर दोन रन्स दिल्या जायच्या. त्यानंतर सुपरमॅक्स (Super Max Cricket) हे नाव सार्थ करण्यासाठी समोरच्या बाजूला एक मॅक्स झोन तयार केलेला. त्या विशिष्ट भागात बॉल गेला आणि तिथे जितक्या रन्स मिळाल्या त्याच्या डबल रन्स बॅटिंग संघाच्या आणि बॅटरच्या खात्यात जमा व्हायच्या. म्हणजे तिथे दोन रन्स निघाल्या तर त्या चार व्हायच्या, आणि चार निघाल्या तर आठ. पावर प्ले पाच ओव्हरचा केला गेलेला. यातील आणखी एक मजेदार नियम म्हणजे शेवटचा एकटा बॅटरही बॅटिंग करू शकायचा. दुसरा केवळ रनर. हे असे आणि आणखी काही वेगवेगळे नियम या सुपरमॅक्स क्रिकेटमध्ये वापरण्यात आले.

क्रिकेटच्या या इंटरेस्टिंग प्रकाराची एकच मॅच खेळली गेली. ती मॅच खेळण्याचा सौभाग्य लाभलं न्यूझीलंड आणि भारत. 4 डिसेंबर 2002 रोजी ख्राईस्टचर्च येथे ही ऐतिहासिक मॅच झाली. सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या कॅप्टन-व्हाईस कॅप्टनच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मणने टीम इंडियाला पहिल्यांदाच लीड केले. न्यूझीलंडने पहिली बॅटिंग करताना दहा ओव्हरमध्ये 123 रन्स चोपले. प्रत्युत्तरात सचिनच्या 27 बॉल 72 रन्समुळे टीम इंडिया 10 रनांची आघाडी घेऊ शकली. न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये मॅकलमच्या 28 बॉल 60 मूळे 118 पर्यंत मजल मारली. यात सेहवागच्या एकाच ओवरमध्ये 31 रन्स कुटले गेलेले. जिंकण्यासाठी मिळालेले 109 रनांचे आव्हान टीम इंडियाला आंद्रे ऍडम्सच्या तीन विकेटमुळे पेलवले नाही. त्यामुळे या ऐतिहासिक मॅचमध्ये सचिनच्या शानदार खेळांतही टीम इंडियाला 21 रन्सने हार पत्करावी लागली. 72 रन्सची तुफानी इनिंग आणि दोन्ही इनिंगमध्ये मिळून पाच विकेट घेणाऱ्या सचिन तेंडुलकरला मॅन द मॅच दिली गेली. मार्टिन क्रो यांच्या जीनियस डोक्यातून आलेली ही भन्नाट कल्पना आयसीसीला मात्र रुचली नाही. त्या एकाच मॅचनंतर आयसीसीने सुपरमॅक्स क्रिकेट (Supermax Cricket)चा गाशा गुंडाळला. तरीदेखील त्या मॅचमधील सचिनच्या बॅटिंगचा ‘वरचा दर्जा’ युट्यूबवर पाहायला मिळू शकतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयोजकाने पासेस नाकारले अन् भारतीय मंत्र्याची सटकली, धीरुभाईंची मदत घेत भारतात ‘असं’ केलं वर्ल्डकपचं आयोजन
विंडीजच्या दिग्गजाने मनाचा मोठेपणा दाखवताच हुकलेली सेमीफायनल, पाकिस्तानी जनरलकडून मिळालं होतं गिफ्ट


Next Post
Virat-Kohli

वर्षभर टीमला लीड करणाऱ्या धुरंधराच्या जागी विराटला का बनवलेलं U-19 संघाचा कर्णधार? जरूर वाचा

Cricketer-Virat-Kohli

"लोक म्हणतात तू विराटचे खूप कौतुक करतो, मी म्हणतो स्वतःला कसे रोखू?" - पाकिस्तानचा माजी दिग्गज

Monkeygate-Scandal

Monkeygate Scandal: भारतीय खेळाडू, बीसीसीआय, कोर्ट आणि मीडियाला सांभाळत भज्जीला वाचवणारा 'डॉक्टर'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143