Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केएल नक्की चुकतोय कुठे? गांगुलींनी सांगितली राहुलची कमजोरी, म्हणाले…

February 27, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
kl-rahul

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग दोन विजय आपल्या नावे केले असले तरी, उपकर्णधार केएल राहुल याचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. राहुलने दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत मिळून फक्त 18 धावा केल्या. तसेच, नागपूर कसोटीतही तो संघर्ष करताना दिसला होता. मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी देखील त्याची भारतीय संघात निवड झालीये. त्याच्याकडून धावा होत नसल्याने आता भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल हा मोठ्या काळापासून फॉर्मशी झुंजत आहे. खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्याची मागणी देखील होतेय. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला आणखी संधी देण्याचा निर्णय घेतला. गांगुली म्हणाले,

“ज्यावेळी तुमच्याकडून धावा होत नाही तेव्हा तुमच्यावर टीका होणे साहजिक आहे. तुम्ही भारतात अपयशी ठरल्यावर तर अधिकच टीका होते. मात्र, संघ व्यवस्थापन तुमच्याबद्दल काय विचार करते हे महत्त्वाचे असते.”

राहुलची नक्की अडचण काय आहे याबाबत बोलताना गांगुली म्हणाले,

“तो तांत्रिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या काहीसा खचलेला दिसतोय. सर्वांना भारतीय सलामीवीरांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. त्याचवेळी संघात असलेले इतर खेळाडू फॉर्ममध्ये असल्याने तुमच्यावरील दबाव आणखी वाढतो.”

सन 2022च्या सुरुवातीपासून केएल राहुल याने 11 कसोटी डावात फक्त 175 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ही 15.90 इतकी राहिली आहे. त्याने रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत नेतृत्व केले होते. त्याने एकूण 47 सामने खेळूनही त्याची कसोटी सरासरी ही फक्त 33.44 इतकीच आहे. याच कामगिरीमुळे त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी होते.

(Sourav Ganguly Statement On KL Rahul Bad Form)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वरळीचे छपरी! श्रेयस अय्यर आणि रोहित शर्माच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, कॅप्शन वाचाच
ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका! तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसह वनडे संघातून पॅट कमिन्स घेणार माघार?


Next Post
IND vs AUS

भारताची चिंता वाढली! तिसऱ्या कसोटीतही नाही खेळू शकरणार हा महत्वाचा फलंदाज?

Team India

"आता तुम्ही कारणे नाही देऊ शकत", आयसीसी ट्रॉफीच्या दुष्काळाबाबत दिग्गजाने टोचले टीम इंडियाचे कान

Steve-Smith

इंदोर कसोटीआधी स्मिथ काढतोय जीव! दोन पराभवांचे उट्टे काढण्यासाठी आखली रणनीती

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143