आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने क्रिकेटचा नवा नियम घोषित केला आहे. क्रिकेट सामन्याची खेळगती नियमित ठेवण्यासाठी हा नियम आणला गेला आहे. या नियमामुळे संघांना आपल्या षटकांची गती कमी होऊ देता येणार नाही. तसेच चूक करणाऱ्या संघाच्या विरोधात असणाऱ्या संघाला याचा फायदा मिळणार आहे. या नियमाचे नाव आहे स्टॉप क्लॉक नियम.
माध्यमांतील वृत्तांनुसार आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने या नियमाला मंजूरी दिली आहे. वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत हा नियम अमलात आणला जाणार आहे. 3 डिसेंबर रोजी ही मालिका सुरू होणार आहे. या नियमानुसार कर्णधारांना गोलंदाजांच्या शिस्तीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. गोलंदाजांकडून चूक झाली, तर संपूर्ण संघाला याची किंमत मोजावी लागणार आहे.
काय आहे स्टॉप क्लॉक नियम?
क्रिकेट सामन्यात दोन षटकांच्या दरम्यान खर्च होणारा मोकळा वेळ नियंत्रणात आणण्यासाठी आयसीसीने हा नियम येऊ घातला आहे. नियमानुसार एक षटक संपल्यानंतर पुढच्या षटकाची सुरुवात 60 सेकंदांच्या आतमध्ये झाली पाहिजे. जर गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून एका डावात तीन वेळा ही चूक झाली, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा मिळतील.
ICC announced new rule,
Stop Clock rule in Cricket:
“Once an over is finished, the fielding team will have to be ready within 60 seconds to bowl the next over. The match officials will start the stop-clock once an over is called. ‘If the bowling team is not ready to bowl the… pic.twitter.com/hGw7bemBxv
— Don Cricket ???? (@doncricket_) November 22, 2023
सध्या वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला 50 षटकांसाठी 3.5 तासांचा वेळ दिला जातो. तसेच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी 1 तास 25 मिनिटांचा वेळ असतो. त्यापेक्षा जास्त वेळ खर्च झाला, तर तीन यार्ड सर्कलचा नियम लागू होतो. या नियमानुसार ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ झाला, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये उभा केला जातो. तसेच आयसीसीच्या नियम 2.22 नुसार खेळाडूंकडून आर्थिक दंड देखील वसूल केला जातो. (What is the ICC new Stop clock rule?)
महत्वाच्या बातम्या –
“धोनी माझा आवडता बॅटिंग पार्टनर”, गंभीरच्या वक्तव्याने उंचावल्या सर्वांच्याच भुवया
संजू सॅमसन-चहलला संधी का मिळाली नाही? दिग्गज नेत्याने विचारला बीसीसीआयला प्रश्न