---Advertisement---

मॅच जिंकताच संपूर्ण संघ भावूक; बांग्लादेशला दशकानंतर महिला टी20 विश्वचषकात विजय मिळाला

---Advertisement---

आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 ची सुरुवात बांग्लादेश विरुद्ध स्कॉटलंड सामन्याने झाली. शारजाह येथे झालेल्या या सामन्यात बांग्लादेश संघाने बाजी मारली. बांग्लादेश संघाने दशकानंतर महिला टी-20 विश्वचषक जिंकला आहे. बांग्लादेशने रोमांचक सामन्यात स्कॉटलंडचा 16 धावांनी पराभव केला. यावेळी संघातील सर्व खेळाडू भावूक झाले. यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे संघाने 10 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला आहे, तर दुसरे कारण म्हणजे हा टी-20 विश्वचषक बांग्लादेशमध्ये होणार होता, परंतु तेथील खराब राजकीय वातावरणामुळे त्याचे आयोजन होऊ शकले नाही.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बांग्लादेश संघाची कर्णधार निगार सुलतानाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. बांग्लादेशने 20 षटकांत सात गडी गमावून 119 धावा केल्या. बांग्लादेशकडून शोभना मोस्त्रीने 36 धावा केल्या, तर शाथी राणीने 29 धावांची खेळी खेळली. कर्णधार सुलतानाने 18 धावा केल्या. स्कॉटलंडकडून सास्किया हॉर्लेने तीन विकेट घेतल्या.

स्कॉटलंडचा संघ 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांना 20 षटके खेळून 7 गडी गमावून 103 धावाच करता आल्या. सलामीवीर साराह ब्रीसने 49 धावा केल्या, मात्र इतर कोणत्याही फलंदाजाला 11 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. हेच पराभवाचे प्रमुख कारण ठरले. बांग्लादेशकडून रितू मोनीने दोन बळी घेतले.

2023, 2020, 2018 आणि 2016 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेशने एकही सामना जिंकला नाही. तर संघाचा शेवटचा विजय 2014 टी20 विश्वचषक दरम्यान होता. एवढेच नाही तर विश्वचषकाचे यजमानपदही बांग्लादेशने घेतले होते. त्यावेळी बांग्लादेशने श्रीलंका आणि आयर्लंडला पराभूत केले होते. आता 2024 मध्ये बांग्लादेशने स्कॉटलंडचा पराभव केला.

हेही वाचा-

पाकिस्तानचा दणदणीत विजय; श्रीलंकेचा एकतर्फी पराभव, भारतासाठी धोक्याची घंटा
इराणी चषकातील द्विशतकानंतर सरफराज खानची सूचक पोस्ट, कोणावर साधला निशाणा?
“हार्दिक पांड्या 18 कोटी रुपयांचा खेळाडू नाही”, माजी मुख्य प्रशिक्षकाचं धक्कादायक वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---