---Advertisement---

‘तुमच्यासोबत खेळण्यासाठी आम्ही मरत नाही’ गांगुलीच्या वक्तव्यावर पाकच्या खेळाडूचे वादग्रस्त वक्तव्य

On: रविवार, एप्रिल 27, 2025 1:53 PM
Ind vs Pak
---Advertisement---

माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांनी मंगळवारी कश्मीर येथे घडलेल्या घटनेनंतर पाकिस्तानला संदेश देत म्हटले होते की, भारताने पाकिस्तानशी असलेले सर्व क्रिकेट संबंध तोडले पाहिजेत. तसेच आयसीसी आणि आशियाई स्पर्धेमध्ये सुद्धा भारताने त्यांच्यासोबत खेळले नाही पाहिजे. त्यांच्या अनुसार प्रत्येक वर्षी भारतात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दहशतवादी हल्ले होतात आणि अजून किती सहन करायचं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर तनवीर अहमदने चुकीच्या शब्दात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले की, सौरव गांगुली साहेब. सन्मानाने भारतीय संघ फक्त आयसीसी स्पर्धेत पाकिस्तान सोबत खेळतो. त्याशिवाय तुमचे भारतीय कोणती मालिका आमच्याशी खेळतात? नका खेळू. तुम्ही आमच्या सोबत खेळावं यासाठी आम्ही मरत नाही आहोत.

22 एप्रिल रोजी भारताच्या कश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. पाच-सहा दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर 26 लोकांचा मृत्यू झाला. ही सर्व घटना पाकिस्तानशी जोडली जात आहे.

याआधी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारतात झालेल्या हल्ल्याविषयी वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या संबंधांमुळे भारत बाईलॅटरल मालिका खेळत नाही. भारत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेला नव्हता. भारतीय संघाचे सर्वसामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---