सरफराज खान गुरुवारी (15 फेब्रुवारी) चांगलाच चर्चेत राहिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी राजकोटमध्ये सुरू झाला. सरफराज खान मागच्या काही वर्षांपासून कसोटी पदार्पणाची संधी शोधत होता. कर्णधार रोहित शर्मा याने अखेर त्याच्यावर विश्वास दाखवला. असे असले तरी, सरफराज ज्या पद्धतीने धावबाद झाला, त्यामुळे रविंद्र जडेजा याच्यावर टीका होत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्वतः सरफराजनेच याविषयी प्रतिक्रिया दिली.
गुरुवारी भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सरफराज खान (Sarfaraz Khan) याने 66 चेंडूत 62 धावांची खेळी केली. डावातील 82व्या षटकात रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सोबतचा संवाद बिघडल्यामुळे नॉन स्ट्राईक एंडवर जडेजा धावबाद झाला. सरफराजच्या विकेटसाठी अनेकजण जडेजाला जबाबदार धरत आहेत. चांगल्या लयीत अशल्यामुळे सरफराजकडून अनेकांना शतकाची अपेक्षा होती. पण जडेजामुळे त्याला तंबूत जावे लागले, असे सोशल मीडियावर बोलले जात आहे.
असे असले तरी, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सरफराज खान याने जडेजाचे कौतुकच केले. 26 वर्षीय फलंदाज म्हणाला, “मी जड्डू भाईला सांगितले होते की, माझ्याशी बोलत राहा. मी नेहमीच फलंदाजी करताना बोलत असतो. खेळताना त्याने मला खप सपोर्ट केला.”
Sarfaraz Khan said “I told Jaddu Bhai to keep talking to me while I bat as I like talking while batting – he supported me a lot today”. [Sahil Malhotra from News18] pic.twitter.com/zgejEDPDRh
— Johns. (@CricCrazyJohns) February 15, 2024
दरम्यान, राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसाखेर भारताने 5 विकेट्सच्या नुकसानावर 326 धावा केल्या आहेत. यात कर्णधार रोहित शर्मा याच्या 131, तर रविंद्र जडेजा याने 110 धावा कुटल्या. इंग्लंडसाठी मार्क वुड याने पहिल्या दिवशी 17 षटकात 69 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी सलामीवीर यशस्वी जयस्वाल 10, शुबमन गिल 0, तर रजत पाटीदार 5 धावा करून बाद झाले. जडेजासह कुलदीप यादव (1*) दुसऱ्या दिवशी भारतासाठी डावाची सुरुवात करेल. (What Sarfraz Khan said at the end of the first day of the Rajkot Test)
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचा तारणहार! अडचणीच्या वेळी जडेजानं ठोकलं शतक, संघाची धावसंख्या दिवसाखेर 300 पार
IND Vs ENG : रोहित शर्माने कसोटीत केला खास विक्रम, धोनीलाही टाकले मागे