टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा ऑनफिल्ड आक्रमकपणा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. आपल्या कर्णधारपदाच्या काळात विराटने ज्याप्रकारे मैदानावर आक्रमकतेने विरोधी संघावर वर्चस्व गाजवले त्याबद्दल त्याचे खूप कौतुक झाले आहे. एवढेच नाही तर विराटने ऑस्ट्रेलियाला जाऊन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स आणि प्रेक्षकांशी त्यांच्याच भाषेत बोलणे सुरू केले आणि यावरून अनेक वादही झाले.
दरम्यान आता टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विराटच्या ऑनफिल्ड आक्रमकतेबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे विराटच्या चाहत्यांना खूप त्रास होऊ शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराटने 23.75 च्या सरासरीने केवळ 190 धावा केल्या होत्या. मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळला गेला. ज्यात विराटने दुसऱ्या डावात नाबाद शतक झळकावले. पण त्यानंतर संपूर्ण मालिकेत त्याची बॅट शांत राहिली. विराट संपूर्ण मालिकेदरम्यान ऑफ साईडला बाहेर जाणाऱ्या चेंडूवर सतत बाद होता. परंतु त्याने आपल्या चुकीपासून धडा घेतला नाही आणि यामुळे तो टीकाकारांच्या निशाण्यावर आहे.
इतकेच नाही तर मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटीत सॅम कॉन्स्टासने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. मेलबर्नमध्ये 19 वर्षीय कॉन्स्टास आणि विराट यांच्यात वादही झाला होता. विराटने कॉन्स्टासला खांद्याला धक्का दिला होता, त्यानंतर आयसीसीने त्याला दंडही ठोठावला होता. याच प्रकरणाबाबत गावस्कर म्हणाले की, ‘विराट कोहलीने खांद्याला खांदा लावून जे केले ते क्रिकेट नाही. भारतीयांना चिथावणी दिली जाते तेव्हा ते प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. पण याठिकाणी विराटला कोणीही चिडवले नव्हते.
गावस्कर पुढे म्हणाले की, “खेळाडू अनुभवाने एक गोष्ट शिकतात, ती म्हणजे प्रेक्षकांवर रागावणे ही चांगली गोष्ट नाही. जे क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये आले असतील ज्यात त्यांनी कोणत्याही खेळाडूला शिवीगाळ केली तर ते वैयक्तिक दुश्मनी नाही. त्त्याऐवजी ते त्यांच्या मनोरंजनासाठी असे करतात. जर खेळाडूंनी अशा गोष्टींवर प्रतिक्रिया दिली तर ती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे केवळ तुमचेच नुकसान होते. कोहलीला हे समजून घ्यावे लागेल की जेव्हा तो अशा परिस्थितीत गर्दीचा सामना करतो तेव्हा उर्वरित खेळाडूंना त्याचा फटका सहन करावा लागतो. कारण त्यांच्यावर दबाव वाढतो. यानंतर इतर खेळाडूही स्टेडियममध्ये पोहोचलेल्या लोकांचे लक्ष्य बनतात”.
हेही वाचा-
या तीन कारणांमुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार
‘हो.. माझी चूक होती…’, बुमराहसोबत झालेल्या वादाबाबत सॅम कॉन्स्टासचा मोठा खुलासा
संजू सॅमसन शर्यतीतून बाहेर! चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रिषभ पंतसोबत कोणाला संधी मिळणार?